-
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेचे औचित्य साधून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल पाच हजार शहाळ्यांचा गुरुवारी महानैवेद्य अर्पण करण्यात आला.
-
ससून रुग्णालयातील रुग्णांना शुक्रवारी (२४ मे) शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे.
-
शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला अवतार हा पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.
-
वैशाख वणव्यापासून देशवासीयांचे रक्षण व्हावे.
-
दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण करण्यात आला.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला.
-
त्यापूर्वी पहाटे ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला.
-
प्रसिद्ध गायक डॉ. अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी आणि श्रेया मयुराज यांनी स्वरांतून गणरायाची पूजा बांधली.
-
त्यानंतर सकाळी आठ ते बारा या वेळात गणेशयाग झाला.
-
(सर्व फोटो सौजन्य : विद्याधर कुलकर्णी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती फेसबुक पेज)

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी