-
काल (२६ मे) रात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकलेल्या रेमल चक्रीवादळाने बंगालमध्ये कहर केला. कोलकाता शहरात जोरदार पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली तर रस्त्यावर पाणी साचले. यामुळे वाहतूक सेवाही काहीवेळ ठप्प झाली. (Express Photo by Partha Paul)
-
रेमल चक्रीवादळामुळे कोलकाता शहरात भिंत कोसळली. या दुर्घटनेत मोहम्मद साजिब या ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. (Express Photo by Partha Paul)
-
दरम्यान, सध्या रेमल चक्रीवादळामुळे बिघडलेल्या स्थितीत सुधारणा होत आहे. वादळाने धारण केलेले रौद्ररूप काही प्रमाणात कमी होत आहे. परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. (Express Photo by Partha Paul)
-
जोराच्या वादळीवाऱ्यामुळे आणि जोरदार पावसामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. लोकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आणि रस्त्यावर दुतर्फापाणी साचल्याचे चित्र आहे. (Express Photo by Partha Paul)
-
कोलकात्यामध्ये रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत आणि विमानतळावरील कामकाज मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.(Express Photo by Partha Paul)
-
रेल्वेच्या जाळ्यावर पाणी साचल्याने सेवा ठप्प झाली आहे. (Express Photo by Partha Paul)
-
मुर्शिदाबाद आणि नादिया या दोन जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. (Express Photo by Partha Paul)
-
रविवारी रात्री कोलकात्यात १४४ मिमी पाऊस झाला.(Express Photo by Partha Paul)
-
महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथके रस्त्यांवरील ढिगारा हटवण्यासाठी आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काम करत आहेत. (Express Photo by Partha Paul)
-
कोलकाता विमानतळावरील सेवा सुरु करण्यात आल्यानंतर पुन्हा सेवा पुरवण्यासाठी विलंब आणि अडचणींचा येत असल्याची माहिती आहे. (Express Photo by Partha Paul)
-
दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिस्थितीशी सामना करण्यासाठी केल्या गेलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. (Express Photo by Partha Paul)
-
यंत्रणांनी नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे. वादळाचा फटका बसलेल्या परिसरात तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. (Express Photo by Partha Paul) हेही पहा- Cyclone Remal: वादळं किती प्रकारची असतात; कशी ठरवतात श्रेणी? ‘रेमल’ चक्रीवादळाच्या निमित्ताने वाचा संपूर्ण माहिती

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख