-
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यभरात निषेध आंदोलन केली जात आहेत. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आव्हाड यांच्याविरुद्ध रान उठविले आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
त्याच झाल असं की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
यामध्येच निषेधाचा भाग म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करण्याचे आयोजन केले होते. त्यानुसार हे आंदोलन काल २९ मे रोजी महाड येथील चवदार तळ्यावर केले जात होते. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
मनुस्मृती दहन करून राज्यसरकार विरोधात आंदोलन करताना आव्हाड आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते, याच आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृती ऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडण्यात आले. त्यानंतर त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. आंबेडकरवादी संघटना आणि भाजपासहित महायुतीने आव्हाड यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्र घेतला. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
त्यानंतर तातडीने आमदार जितेंद्र आव्हाडांनी माफी मागत असल्याचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीयावर टाकला. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
परंतु हे आंदोलनाचं प्रकरण आव्हाडांच्या अंगलट आल्याचं चित्र दिसत आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
आज राज्यभर त्यांच्याविरुद्ध आंदोलन होत आहेत, निषेध व्यक्त केला जात आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
आज मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी येथेही आंबेडकरी संघटनांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
आरपीआय आणि भाजपा पक्षांनी यावेळी आव्हाडांचे फोटो असलेल्या पोस्टरवर जोडो मारो आंदोलन केले आहे. यावेळी आव्हाडांचे फोटोही जाळण्यात आले. (Express photo by Sankhadeep Banerjee) हे देखील पहा- वाराणसीतील १९ लाख मतदार यंदा पंतप्रधान मोदींबाबत काय फैसला करणार; मागील दोन निवडणुकीत…
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश