-
देशामध्ये १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीची मुदत १६ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे १६ जूनच्या अगोदर १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचा जो निकाल आला आहे, त्यामधील विजयी पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची आवश्यकता आहे. (ANI Photo)
-
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ५ जून रोजी कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. (ANI Photo)
-
त्यानंतर त्यांनी एनडीए आघाडीची बैठक बोलावली आणि या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकमताने निवड झाल्याची माहिती आहे. (PTI Photo)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानावर एनडीएच्या घटक पक्षांची स्वतः नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. (PTI Photo)
-
या बैठकीला एनडीए आघाडीतील घटक पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते. (PTI Photo)
-
यामध्ये पीडीपीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू, जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिराग पासवान हे उपस्थित होते. (PTI Photo)
-
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेसाठी पूर्ण तयारी केली असल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची सभागृह नेता म्हणून निवड झाली असून, पंतप्रधान मोदी यांची घटकपक्षांच्या नेत्यांनी अधिकृतपणे एनडीएचा नेता म्हणून निवड केली आहे. (PTI Photo)
-
तर निवडून आल्यानंतर मोदींनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटलं की “मी सर्व मित्र पक्षांचे आणि खासदारांचे आभार मानतो ज्यांनी मला एनडीएचा नेता म्हणून एकमताने निवडले आहे. (PTI Photo)
-
ही बैठक संपल्यानंतर एनडीए आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्याकडे जाऊन आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत, अशी माहिती एनडीटीव्ही च्या वृत्तात दिली आहे. (PTI Photo)
-
लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २४० जागा मिळवता आल्या आहेत. बहुमतासाठी आणखी ३२ जागांची आवश्यकता आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टीडीपीचे आंध्र प्रदेश मध्ये १६ खासदार निवडून आले आहेत. तर नितेश कुमार यांच्या जेडीयूचे बिहारमध्ये १२ खासदार निवडून आले आहेत. (PTI Photo)
-
लोक जनशक्ती पार्टीचे ५ खासदार या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. या तीनही पक्षांनी भाजपाला साथ दिली तर भाजपा सहज सत्ता स्थापन करेल अशी स्थिती आहे. (PTI Photo)
-
हेही पहा- PHOTOS: नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा; नव्या सरकारसाठी एनडीए आघाडीची पार पड… (PTI Photo)
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”