-
Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala 2024: किल्ले रायगडावर आज गुरुवारी (६ जून) तारखेनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा पडला.
-
या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले होते.
-
शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी या शिवराज्याभिषेक सोहळा हजेरी लावली होती.
-
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर रायगडावरील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी आज किल्ल्याच्या परिसरात १, ६०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
त्यामुळे रायगडाला छावणीचे स्वरुप आले आहे.
-
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, रायगडच्यावतीने तारखेनुसार या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
-
दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची बुधवारी गडपुजनाने सोहळ्याला सुरूवात झाली.
-
रायगड खोऱ्यातील २१ गावातील सरपंच या सोहळ्यात सहभागी झाले होते.
-
यानंतर होळीच्या माळावर धार तलवारीची हा महाराष्ट्राच्या युध्दकलेवर आधारीत कार्यक्रम सादर केला.
-
शिवशाहीरांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित पोवाडे सादर केले.
-
आज (गुरुवारी) सकाळपासून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मुख्य सोहळा सुरू झाला.
-
या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शहाजी राजे उपस्थित होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रोहित पवार / सोशल मीडिया)
![pranit more assaulted for joke on veer pahariya](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/pranit.jpg?w=300&h=200&crop=1)
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”