-
तेलगू नेटवर्क ई-टीव्ही या समूहाचे संस्थापक तसेच रामोजी फिल्म सिटीचे निर्माते आणि शिल्पकार चेरुकुरी रामोजीराव यांचे आज ८ जून रोजी हैदराबादमध्ये निधन झाले ते ८७ वर्षांचे होते. (Photo- Express Archive)
-
त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते त्यांनी आज पहाटे ४.५० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. याबद्दलची माहिती रामोजी समूहाच्या वाहिनी पैकी एक असलेल्या ईटीव्ही तेलंगणा या वाहिनीवर देण्यात आली आहे. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी झाला होता. (Photo- Express Archive)
-
हैदराबाद मधील रामोजी फिल्म सिटी या अलौकिक आणि अचंबित करणाऱ्या चित्रनगरीचे संस्थापक अशी त्यांची ओळख आहे. रामोजी फिल्म सिटीच्या निर्मितीसारख्या भरीव योगदनाबद्दल त्यांना सरकारने पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित केलेले आहे. (Photo- Express Archive)
-
रामोजी राव यांनी १९७४ मध्ये एनाडू या प्रसिद्ध वृत्तपत्राची सुरुवात केली, तसेच त्यांनी ५० हून अधिक चित्रपट आणि लघुपटांचीही निर्मिती केली आहे. (Photo- Express Archive)
-
त्यांच्या निधनाच्या बातमी नंतर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे. “माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील टायटन आज आपण गमावला आहे.” अशा शब्दांत राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला. (Photo- Express Archive)
-
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. दरम्यान आजच्या या बातमीनंतर त्यांनी रामोजी राव यांच्या दूरदृष्टीबद्दल भावना व्यक्त करत, त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. (Photo-@narendramodi/X)
-
दरम्यान रामोजीराव यांच्या निधनाच्या बातमीने तेलगू चित्रपटसृष्टीवर शोक काळा पसरली आहे. चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी ५० हून अधिक चित्रपट आणि लघुपटांची निर्मिती केली. या फोटोमध्ये के श्रीनिवास, रामोजीराव, ताराचंद बडजात्या आणि एन चंद्रा हे आहेत. (Photo- Express Archive)
-
सुपरस्टार चिरंजीवी ज्युनिअर एनटीआर रामगोपाल वर्मा विष्णू मंचू मनोज मंचू यासारख्या दक्षिणात्य अभिनेत्यांनी सोशल मीडिया वरून त्यांच्या निधनाप्रती शोक व्यक्त केला या फोटोमध्ये अभिनेता श्रीकांत आणि चित्रपट निर्माता रामोजीराव दिसत आहेत. (Photo- Express Archive)
-
चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे योगदान रामोजीराव यांनी दिलेली रामोजी फिल्म सिटी आहे. जवळपास २ हजार एकर मध्ये पसरलेली वास्तू गेल्या अडीच दशकांपासून चित्रपट क्षेत्रातील लोकांना सेवा देत आहे. उत्तम प्रकारची चित्रनगरी, विविध सेट्स आणि पायाभूत सुविधा रामोजी फिल्म सिटी मध्ये आहेत. (हा एक हिरव्यागार बागेचा अगदी खराखुरा वाटणारा सेट आहे.) (Photo- Express Archive)
-
रामोजी फिल्म सिटी मध्ये प्रसिद्ध चित्रपट बाहुबली तसेच ऑस्कर विजेता आर आर आरसह संपूर्ण भारतातील २५०० हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. (रामोजी फिल्म सिटीमधील ही एक फुलांची बाग आहे.) (Photo- Express Archive)
-
बाहुबली या ब्लॉकबस्टर ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सेट हा १०० एकरामध्ये तयार करण्यात आला होता. विविध राजवाडे, विविध पुतळे, पर्यटन वास्तू, काल्पनिक पण तितकेच खरे वाटणारे शहर या सर्वांची निर्मिती करण्यात आली होती. त्यासर्व सेट्सची झलक अजूनही रामोजी फिल्म सिटी मध्ये अनुभवता येते. (Photo- Express Archive)
-
दरम्यान प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर शोक व्यक्त करत, या माध्यमकर्मी रामोजीराव यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. राजामौली यांनी लिहिले की “या माणसाने आपल्या ५० वर्षांच्या जीवनामध्ये कठोर परिश्रम आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करत लाखो लोकांना रोजगार, रोजी रोटी प्रदान केली. रामोजीराव यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांना सरकारने भारतरत्न प्रदान करावे हीच त्यांना सर्वात मोठी श्रद्धांजली असेल असे म्हटले आहे.” (या फोटोमध्ये रामोजीराव यांच्यासोबत दिग्दर्शक श्रीनू वायटला हे दिसत आहेत.) (Photo- Express Archive) हेही पहा- PHOTOS : “मला त्यात काही तथ्य…”, कंगनाच्या झापड प्रकरणावर शेतकरी नेते राकेश टिकैत काय म्हणाले?
![amitabh bachchan says time to go](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/amitabh-bachchan-says-time-to-go-1.jpg?w=300&h=200&crop=1)
“जाण्याची वेळ झाली…”, अमिताभ बच्चन यांची पोस्ट