-
२०१४ आणि २०१९ साली सलग दोन वेळा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसले. (Photo- Indian Express)
-
आज ९ जून रोजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. (Photo- ANI)
-
संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवन येथे नरेंद मोदी यांचा शपथविधी पार पडणार आहे. राष्ट्रपती त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. यावेळी त्यांच्यासोबत इतरही मंत्री शपथ घेणार आहेत. (Photo- ANI)
-
दरम्यान शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी राजघाटावर पोहोचले. (Photo- BJP/X)
-
राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या समाधीस्मारकाला त्यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. (Photo- BJP/X)
-
त्यानंतर त्यांनी समर स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. (Photo- BJP/X)
-
नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्याही समाधी स्थळावर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. (Photo- BJP/X)
-
दरम्यान, ७ जून रोजी नरेंद्र मोदी यांची एनडीए आघाडीच्या नेतेपदी आणि संसदेतील सभागृह नेतेपदी एकमताने निवड झाली आहे.
-
आज राष्ट्रपती भवनात शपथविधीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. (Photo- ANI)
-
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होणार नरेंद्र मोदी हे देशाचे दुसरे पंतप्रधान असणारं आहेत. (Photo- BJP/X)

धक्कादायक! मार्क वाढवून देतो सांगत दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल