-
Shreemant Dagadusheth Halwai Ganapati Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीला आज (१० जून) डाळिंबाच्या सजावटीने महानैवेद्य दाखविण्यात आला.
-
ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणरायचा पाताळातील अवतार असलेला शेषात्मज गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
-
यानिमित्ताने मंदिरात फुलांच्या शेषनागाची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
-
मंदिरात पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला.
-
त्यानंतर राहुल एकबोटे यांनी गायनसेवा रूजू केली.
-
गणेशयाग, सहस्त्रावर्तने आणि गणेश जागर हे धार्मिक कार्यक्रम झाले.
-
गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचा श्री शेषात्मज जन्मोत्सव महत्त्वपूर्ण मानला गेला आहे.
-
‘शेषात्मज गणेश जयंती’निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विविध कार्क्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विद्याधर कुलकर्णी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती फेसबुक पेज)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड