-
मुंबईतील ‘लालबागचा राजा’ म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
-
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन आज मंगळवारी (११ जून) रोजी सकाळी ६ वाजता पार पडले.
-
मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे व रत्नाकर कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झाले.
-
यावेळी मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.
-
लवकरच गणेशोत्सवाचे मंडप पूजनदेखील पार पडणार आहे.
-
यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.
-
गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : लालबागचा राजा पेज / इन्स्टाग्राम)
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल