-
चंद्रबाबू नायडू यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. (PTI)
-
या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि नितीन गडकरी उपस्थित होते. (PTI)
-
शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अलिंगन देऊन चंद्राबाबू यांचं अभिनंदन केले. (PTI)
-
विजयवाडाच्या गन्नावरम विमानतळाजवळ आयोजित सोहळ्यात नायडूंनी सकाळी ११.२७ च्या सुमारास शपथ घेतली. (PTI)
-
जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी मंत्रीमंडळात मंत्री म्हणून घेतली असून त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते अशी माहिती मिळत आहे. (PTI)
-
चंद्राबाबू यांचे चिरंजीव नारा लोकेश यांनीही आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. (PTI)
-
टीडीपी, भाजपा आणि जनसेना या एनडीए आघाडीने आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे. (PTI)
-
१७५ जागांपैकी १६४ जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. त्यापैकी टीडीपीने १३५, जनसेना २१ आणि भाजपाने ८ जागा जिंकल्या आहेत. (PTI)
-
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अभिनेता रजनीकांत, अभिनेता चिरंजीवी आणि नंदामुरी बालकृष्णा हे या शपथविधी सोहळ्यानंतर बातचीत करताना. (PTI) हे देखील पहा- PHOTOS : अयोध्यानगरीत भाजपाचा पराभव केलेले विजयी उमेदवार अवधेश प्रसाद कोण आहेत? वाचा …
Kunal Kamra Controversy : “मी जिथे राहत नाही तेथे जाणं म्हणजे…”; कुणाल कामराची सूचक पोस्ट, मुंबई पोलिसांना डिवचलं?