-
Shreemant Dagadusheth Halwai Ganapati Pune: ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषाने श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचा मंगळवारी परिसर दुमदुमून गेला.
-
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली.
-
मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत विविधरंगी फुलांनी आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे.
-
विद्युतरोषणाने संपूर्ण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले आहे.
-
दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मध्यभागात वाहतूक कोंडी झाली होती.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने अंगारकीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी गायनसेवा रूजू केली.
-
त्यापूर्वी ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला.
-
स्वराभिषेकानंतर गणेशयाग व विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
-
मंदिरावर करण्यात आलेल्या पुष्पसजावटीमध्ये १२०० किलो शेवंती, १८०० किलो झेंडू, गुलाब, लिली, ऑर्केड यांसह विविध फुलांचा समावेश होता.
-
महिला आणि पुरुष अशा २१५ जणांनी सलग पाच दिवस काम करुन सजावट साकारली.
-
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अष्टविनायकांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या होत्या.
-
पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.
-
श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : विद्याधर कुलकर्णी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती फेसबुक पेज)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन