-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला काल (२६ जून) दोन छोट्या पाहुण्या दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात पोहोचल्या.
-
या दोन छोट्या मुली हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांच्या नाती आहेत. दत्तात्रय हे काल पंतप्रधान कार्यालयात या दोन मुलींसह पोहोचले.
-
दत्तात्रय यांच्या नातींनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एक खास कविता लिहिली होती. ती सादर केल्याचा व्हिडिओ स्वतः पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
या छायाचित्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या छोट्या २ चिमुकल्या पाहुण्या दिसत आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही चिमुकल्या पऱ्यांना भेटून खूप आनंदी दिसत होते, त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. कामाच्या व्यापातून पंतप्रधानांनी या छोट्या मुलींना जवळ घेऊन प्रेम केले. याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा, त्यागाचा गौरव करणारी कविता दोन्ही मुलींनी गाऊन दाखवली.
-
चिमुकल्या मुलींनी ऐकवलेली कविता मोदींनाही खूपच आवडली. मुलींना जवळ घेत त्यांनी ‘वाह’ असे बोलून या कवितेला आणि त्या मुलींच्या लडिवाळ सादरीकरणाला दाद दिली.
-
याधीही अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी कामातील व्यापातून वेळ काढून समाजातील प्रत्येक घटकातील लोकांशी भेटले असल्याचे आपण पाहिले आहे.
-
यातच आता ही या लडिवाळ छोट्या पाहुण्यांशी केलेली भेट म्हणावी लागेल.
-
(All Photos – ANI/Naremdra Modi Social Media) हेही पाहा- PHOTOS : शबाना आझमी ते एसएस राजामौली, भारताच्या ‘या’ दिग्गज कलाकारांना अकादमी सदस्यत्वासाठी आमंत्रण!
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच