-
Thane News Update: घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात अवजड वाहन भर रस्त्यात बंद पडल्याने आनंदनगर ते कापूरबावडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
-
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वाहन चालकांनी मानपाडा, कोलशेत, ब्रम्हांड, ढोकाळी मार्गावरून वाहतूक करण्यास सुरुवात केली.
-
त्यामुळे या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले आहेत.
-
अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी वाहन चालकांना एक ते सव्वा तास लागत आहे.
-
सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरु झालेली कोंडी सकाळी ११ नंतरही सुरळीत झाली नव्हती. शाळेच्या बसगाड्या या कोंडीत अडकून होत्या. त्यामुळे विद्यार्थी देखील शाळेत वेळेत पोहचू शकले नाहीत.
-
घोडबंदर येथून आनंदनगर सिग्नल परिसरातून अतिअवजड वाहन वाहतुक करत होते. शुक्रवारी ७.३० वाजताच्या सुमारास हे वाहन अचानक हे वाहन बंद पडले.
-
या वाहनात मोठ्याप्रमाणात लोखंडी वस्तू होत्या. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनांसाठी मार्गिका अत्यंत अरुंद झाली आहे. तसेच ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यातच वाहन बंद पडल्याने दोन्ही मार्गिकांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाली होती.
-
आनंदनगर ते कापूरबावडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घोडबंदर भागात अनेक खासगी आणि सरकारी शाळा आणि महाविद्यालय आहेत. वाहतूक कोंडीमुळे शाळेच्या बसगाड्या कोंडीत अडकून होत्या. तसेच घोडबंदरमधून ठाण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोंडीचा फटका बसला.
-
दोन ते अडीच तास शाळेच्या बसगाड्या कोंडीत अडकून होत्या. त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेत पोहचू शकले नाही.
-
नोकरदारांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. काही वाहन चालकांनी मनोरमानगर, कोलशेत, ब्रम्हांड, ढोकाळी मार्गे वाहतुक करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या पर्यायी मार्गांवरही कोंडीचे चित्र होते.
-
वाहतूक पोलिसांकडून या अवजड वाहनाला रस्त्यामधून बाजूला काढण्याचे कार्य सुरु होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास हे वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. परंतु वाहनांचा भार वाढल्याने कोंडी कायम होती.

Vasant More : वसंत मोरेंचा गंभीर आरोप; “स्वारगेट आगारात रोज बलात्कार होत आहेत, बसेसचं लॉजिंग करुन…”