-
विश्वविजेत्या भारतीय संघाचं काल मुंबईकरांनी जंगी स्वागत केलं. मरीन ड्राईव्ह परिसरात काल क्रिकेटप्रेमींचा जनसागर उसळला होता. तर आज भारतीय संघातील काही खेळाडूंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. महाराष्ट्र विधानभवनाच्या सभागृहात विश्वविजेत्या भारतीय खेळाडूंच्या कौतुकासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री निवास म्हणजेच वर्षा बंगल्यावर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल हे खेळाडू मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वांचं स्वागत आणि सत्कार केला. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी श्रीगणेशाची मूर्ती सदिच्छा भेट म्हणून खेळाडूंना दिल्याचे पाहायला मिळाले. या फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत.
-
भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
फलंदाज शिवम दुबे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
सूर्यकुमार यादव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
कर्णधार रोहित शर्माशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधताना
-
चारही खेळाडू मुंबईत राहतात, मुंबईकर आहेत त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचं विशेष कौतुक केलं आहे.
-
दरम्यान यावेळी आमदार प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा आणि इतरही सहकारी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
-
या खास भेटीचा वर्षा बंगल्यावरील एक सामुहिक फोटो
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”