-
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Photos : Express Photos Ganesh Shirshekar 08-07-24 ,Mumbai.)
-
पावसामुळे विविध भागात पाणी साचले आहे. अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे.
-
या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम तर झालाच, पण स्थानिक रहिवाशांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-
पाणी साचल्याने बस आणि रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
-
मुंबईत रविवारी रात्री १ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या ६ तासांत ३०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान, आणखीनही पावसाची संततधार मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरूच आहे.
-
अतिवृष्टीमुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे.
-
त्याचबरोबर रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल गाड्या ठप्प झाल्या आहेत. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.
-
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) नेही पाणी साचल्यामुळे अनेक बसेसचा मार्ग बदलून दुसऱ्या मार्गावरून वळवल्या आहेत.
-
ही सर्व परिस्थिती पाहता मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्य तीव्र केले आहे. बाधित भागात पंप लावून पाणी काढण्याचे काम सुरू आहे. तसेच गरज असल्यासच बाहेर पडावे, अन्यथा घरातच राहा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. (पीटीआय फोटो)
-
भारतीय हवामान विभागाने ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात आणखी पुढील दोन दिवस पावसाची संततधार राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
-
लोकसत्ताचे छायाचित्रकार गणेश शिरसेकर यांनी आज मुंबईत टिपलेली ही सर्व छायाचित्रे. हेही पाहा- Jagannath Rath Yatra : वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडकतो ध्वज, जाणून घ्या जगन्नाथ मंदिर…

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”