-
मुंबईत आज सकाळपासून सलग पाऊस कोसळत आहे.
-
त्यामुळे अनेक परिसरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
-
दरम्यान दुपारी तीन नंतर पावसाचा जोर अधिकच वाढल्याने मुंबईतील अंधेरी परिसरातील सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
-
हवामान खात्याने आज मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.
-
दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
नवी मुंबई, ठाणे, कल्याण, आणि भिवंडी या परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसत असल्याची माहिती समोर आली आहे.
-
मुसळधार पावसाने लोकल ट्रेन्सवरही परिणाम झाला आहे. परिणामी लोकल धिम्यागतीने सुरू आहेत.
-
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत असून, मुंबईतही आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Photos: Express photo by Sankhadeep Banerjee. 13.07.2024.)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल