-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल १४ जुलै रोजी, पंढरपूरला निघालेल्या वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
-
पंढरपूर तालुक्यातील करकंब या गावातून निघालेला श्री संत निळोबाराय पालखी सोहळा वाटेत असताना विठू माऊली या नामाचा गजर करत मुख्यमंत्री वारीबरोबर चालले.
-
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बांधकाम मंत्री दादा भुसे त्यांच्यासमवेत होते.
-
आषाढी एकादशी आता काहीच दिवसांवर राहिलेली आहे.
-
त्याच पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेऊन सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी काल मुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यावर होते.
-
पालखीत चालताना मुख्यमंत्र्यांनी संत तुकाराम महाराज यांचे शिष्य संत निळोबाराय यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
-
यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद साधला.
-
दरम्यान. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी चंद्रभागा नदीत पाय धुतले.
-
वारीतील सहभागी महिला भगिनींनी त्यांना राखीही बांधली.
-
वारकरी संप्रदायाचा ध्वज यावेळी मुख्यमंत्र्यांनी खांद्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.
-
तसेच, वारकऱ्यांच्या भजनात तल्लीन होत, मुख्यमंत्री शिंदे विठुरायाचे नामस्मरण करत असल्याचेही पाहायला मिळाले.
-
मुख्यमंत्री शिंदेनी वारीत टाळ वाजवला.
-
तसेच विणाही घेतला.
-
येत्या १७ जुलैला आषाढी एकादशी आहे.
-
यंदाच्या आषाढी एकादशीला गतवर्षीप्रमाणे विठुरायाच्या पूजेचा मान मुख्यमंत्री शिंदेंनाच मिळणार आहे.
-
परंपरेनुसार मुख्यमंत्री पदावरील व्यक्तींना हा मान दिला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची पूजा केली जाईल.
-
(सर्व फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”