-
राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाचा हाहाकार झाला आहे.
-
पुण्यातही जोरदार पाऊस बरसत आहे, रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रस्त्यांवर बचाव पथके तैनात करण्यात आले आहेत.
-
पुण्यातील शाळा, कॉलेजला सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून होणाऱ्या मुसळधार पावसाच्या अनुषंगाने प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क झाले आहे.
-
पुण्यामधील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर आणि पुलाची वाडी या परिसरांतील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.
-
पुलाची वाडी आणि एकता नगर, बंडगार्डन, निंबजनगर मधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक लोक अडकून पडले आहेत.
-
त्यामुळे प्रशासन सतर्क असून परिसरात एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत, त्या नागरिकांना सर्वोतपरी मदत करत आहेत.
-
नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु असल्याचे पुण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
-
पुण्यातील खडकवासला परिसरात अतिवृष्टीचा अंदाज असल्याने खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल रात्रीच खडकवासला धरण १०० टक्के भरले, त्यामुळे आज पहाटे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, सिंहगड परिसरातील निंबजनगरमध्ये महिला, लहान मुले, नागरिक अडकले, एकतानगर परिसरात बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. सिंहगड रस्त्यावरील ५ सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली, भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत, संगम पूल पुलासमोरील वस्तीत पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे.
-
(Photos Source : Express photo Arul Horizon 25/07/2024, Pune) हेही वाचा- पुण्यात पावसाचा कहर, मुठा नदी पात्र तुडुंब भरल्याने सोसायट्यांमध्ये शिरले पाणी, सिंह…
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच