-
15 ऑगस्ट 2024 रोजी भारत देश आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशभक्तीच्या आवेशाने देश भरुन गेला आहे आणि तयारी जोरात सुरू आहे. देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणं तिरंग्याने सजवण्यात आले आहेत. नवी दिल्लीत जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत, तिथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. महाविद्यालयांपासून शाळा आणि संस्थांपर्यंत सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे आणि सर्वजण त्यांच्या परेडच्या कार्यक्रमासाठी, देशभक्तीपर कार्यक्रम आणि ध्वजारोहण समारंभासाठी सज्ज आहेत. मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य, स्वातंत्र्यदिनी साजरे करण्यासाठी देशातील नागरिक तयारी करत असताना, अभिमान आणि एकात्मता प्रतिबिंबित करणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीतील काही खास छायाचित्रे पाहूयात.
-
स्वातंत्र्य दिनापूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन उजळून निघाले. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी फुल ड्रेस रिहर्सल करण्यात आली. यावेळी लष्करी हेलिकॉप्टरने लाल किल्ल्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
राजौरी जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनापूर्वी सीमेवर (LOC) नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
कोलकातामध्ये स्वातंत्र्य दिनापूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाची इमारत तिरंग्यांनी उजळून निघाली. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
नादियामध्ये, स्वातंत्र्य दिनाच्या तयारीदरम्यान मुली भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात त्यांचे चेहरे रंगवताना. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरंग्यांनी उजळून निघाले. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
भारतीय तटरक्षक दलाचे जवान लक्षद्वीपमध्ये 78 व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘हर घर तिरंगा मोहिमेचा’ भाग म्हणून पाण्याखाली राष्ट्रीय ध्वज फडकवत आहेत. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
अमृतसरमध्ये पारंपारिक पंजाबी पोशाखातील विद्यार्थी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवासाठी फुल ड्रेस रिहर्सलमध्ये भाग घेताना. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी फुल ड्रेस रिहर्सल करताना भारतीय सशस्त्र दलाचे जवान. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
नवी दिल्लीतील एका दुकानात एक महिला तिच्या मुलीसाठी तिरंगी बांगड्या विकत घेत आहे. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
नोएडा येथील मेट्रो स्टेशनवर स्वातंत्र्य दिनापूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याने पोलिस कर्मचारी प्रवाशांच्या बॅग्स तपासत आहेत. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
लाल किल्ल्यावर 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवासाठी फुल ड्रेस रिहर्सल दरम्यान सुरक्षा कर्मचारींचे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
नवी दिल्लीत स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली सचिवालय तिरंग्याने उजळले. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
बेंगळुरूमध्ये 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवापूर्वी विधान सौधाजवळ एक विक्रेता राष्ट्रीय ध्वज विकत आहे. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी फुल ड्रेस रिहर्सल करताना एनसीसी कॅडेट. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापूर्वी नवी दिल्लीतील लाल किल्ला तिरंग्याने झाकण्यात आला आहे. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
आग्रा येथील ताजमहाल येथे स्वातंत्र्य दिनापूर्वी एक सीआयएसएफ जवान. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी फुल ड्रेस रिहर्सल करताना एनसीसी कॅडेट. (फोटो स्रोत: पीटीआय)
-
चेन्नईमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या तालमी दरम्यान राष्ट्रध्वज उघडताना विद्यार्थी. (फोटो स्रोत: PTI)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का