-
आज रक्षाबंधनाचा सण आहे.
-
बहीण भावाच्या अतूट नात्याचा हा सण आहे.
-
या सणाच्या निमित्ताने आज पंकजा मुंडे यांनी मुंबईमध्ये भाऊ धनंजय मुंडे यांना राखी बांधली आहे.
-
पंकजा आणि प्रीतम या दोन्ही बहिणींनी धनंजय मुंडे यांचा औक्षण केलं आणि त्यानंतर दोघी बहिणींनी त्यांच्या भावाला म्हणजे धनंजय मुंडेंना राखी बांधली.
-
आज राज्यामध्ये राजकीय रक्षाबंधनही पाहायला मिळालं.
-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे असलेले मुंडे भाऊ-बहीण या २०२४ लोकसभा निवडणुकीत मात्र एकत्र पाहायला मिळाले होते.
-
रक्षाबंधनाच्या निमित्ताने या दोन्ही मुंडे भाऊ बहिणीचा स्नेह मिलाप राज्याला पाहायला मिळाला.
-
यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याचेही पाहायला मिळाले.
-
तर भाऊ धनंजय मुंडे यांनी बहिणीला मायेची मीठी देत खास गिफ्टही दिले.
-
(सर्व फोटो धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)

Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images