-
गुजरातमध्ये सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 18 जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. (पीटीआय)
-
कच्छ, द्वारका, जामनगर, राजकोट ते वडोदरा पाण्यामध्ये बुडाले आहेत. (Express Photo by Bhupendara)
-
वडोदरा येथे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे लोकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. वडोदरामध्ये विश्वामित्री नदीला तुडुंब पूर आला आहे. (पीटीआय)
-
विश्वामित्री नदीचे पाणी शहरांमध्ये शिरल्याने सखल भागाला मोठा फटका बसला आहे. (Express Photo by Bhupendara)
-
गुजरातमध्ये पाणी साचल्याने इमारती, रस्ते आणि वाहने पाण्यात बुडाली आहेत. लष्कर मदतकार्यात गुंतले आहे. (पीटीआय)
-
त्याचबरोबर किमान २८ जणांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. (Express Photo by Bhupendara)
-
गुजरातमधील कच्छ, द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, जुनागड, राजकोट, बोताड, गीर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. (पीटीआय)
-
यासोबतच पुढील ५ दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. (Express Photo by Bhupendara)
-
गुजरातमध्ये पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. (पीटीआय)
-
संभाव्य अतिवृष्टीमुळे राज्यातील परिस्थिती आणखी बिघडू शकते. (Express Photo by Bhupendara)
-
मुसळधार पावसामुळे गुजरातमधील रस्ते आणि रेल्वे मार्गही जलमय झाले आहेत. (पीटीआय)
-
अशा परिस्थितीत मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससह आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Express Photo by Bhupendara)
-
२९ ऑगस्टला म्हणजे आजरोजी हवामान खात्याने गुजरातमधील ३३ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (पीटीआय)
-
वडोदरा शहर पाण्याने तुडुंब भरले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्याची परिस्थिती आहे. अनेक घरे बुडाली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी उंच ठिकाणी किंवा त्यांच्या घरांच्या छतावर चढले आणि तिथे अडकून पडले. (Express Photo by Bhupendara)
-
मात्र, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी अडकलेल्या लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. वडोदरामधून आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. (पीटीआय)
-
NDRF आणि SDRF व्यतिरिक्त, लष्कर, प्रशासन, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दल देखील गुजरातमध्ये अलर्ट मोडवर आहेत. लोकांच्या मदतीसाठी सातत्याने बचावकार्य सुरू आहे. (पीटीआय)
-
त्याचवेळी, पीएम मोदींनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. (Express Photo by Bhupendara)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच