-
गुजरातमध्ये गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ३५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे द्वारका आणि वडोदरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाव्य परिस्थिती आणि मदत कार्याच्या स्थितीवर चर्चा केली. गुजरात सरकारच्या विनंतीनुसार, भारतीय लष्कराने बचाव कार्यात मदत करण्यासाठी सहा तुकड्या पाठवल्या आहेत. आतापर्यंत १७,८०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. (पीटीआय फोटो)
-
भारतीय लष्कराचे जवान वडोदरा येथील पूरग्रस्त सामा परिसरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत आहेत. (पीटीआय फोटो)
-
राजकोटमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर परिसरात पाणी साचले आहे. (पीटीआय फोटो)
-
गुजरातमधील कच्छ, द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, जुनागड, राजकोट, बोताड, गीर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. (पीटीआय)
-
वडोदरा मध्ये एक व्यक्ती एका महिलेला हातगाडीवरून रस्ता ओलांडण्यात मदत करत आहे. (पीटीआय फोटो)
-
जोरदार पावसामुळे राजकोटमधील रामनाथ महादेव मंदिरात पाणी साचले. (पीटीआय फोटो)
-
भाजपा नेत्या रिवाबा जडेजा यांनी जामनगरमधील अतिवृष्टीच्या पुरामुळे प्रभावित झालेल्या परिसरात जाऊन पाहणी केली. (पीटीआय फोटो)
-
काल २९ ऑगस्ट रोजी वडोदरातील सखल भागांतील नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. (पीटीआय फोटो)
-
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अधिकच बिकट होत आहे, दरम्यान, एक व्यक्ती घरातून पाणी रिकामे करताना. (पीटीआय फोटो)
-
गुजरातमध्ये सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील १८ जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. (पीटीआय)
-
मुसळधार पावसामुळे जामनगर, राजकोट आणि द्वारका येथील पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांच्या बचावकार्यात लष्कराचे जवान गुंतले आहेत. (पीटीआय फोटो)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख