-
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती तयार झाली आहे. पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (पीटीआय फोटो)
-
येथील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की, लोक कंबरभर पाण्यातून रस्ता ओलांडत आहेत. (पीटीआय फोटो)
-
मुसळधार पावसामुळे येथे एक इमारतही कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.
-
या चित्रात तुम्ही पाहू शकता की, मुसळधार पावसानंतर बुडामेरू वागू नदीला आलेल्या पुरामुळे विजयवाडा शहर असे पाण्याखाली गेले आहे. (एएनआय फोटो)
-
पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान मदत करत आहेत. या छायाचित्रात एनडीआरएफचा एक जवान पूरग्रस्त भागातून नवजात बालकाला सुरक्षित स्थळी नेताना दिसत आहे. (पीटीआय फोटो)
-
या फोटोमध्ये, विजयवाडा शहराचे पोलिस आयुक्त आयपीएस एसव्ही राजशेखर बाबू सहकाऱ्यांसह विजयवाड्यातील अतिवृष्टीनंतर पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा आढावा घेत आहेत. (पीटीआय फोटो)
-
आंध्र प्रदेशचे उत्पादन शुल्क मंत्री कोल्लू रवींद्र, राज्याचे नगरपालिका प्रशासन आणि शहर विकास मंत्री पी. नारायण आणि तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) खासदार केसिनेनी चिन्नी यांनी रविवारी कृष्णा येथील चित्तनगरच्या पूरग्रस्त भागाला भेट दिली. (एएनआय फोटो)
-
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी बुडामेरू, विजयवाडा येथील पूरग्रस्त भागांना भेट दिली. (एएनआय फोटो)
-
सीएम चंद्राबाबू नायडू म्हणाले, “बचाव पथकांनी ऑपरेशन सुरू केले आहे. मदत देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि लोकांना अन्न आणि अत्यावश्यक वस्तू बोटीद्वारे पोहोचवल्या जातील. ज्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही बोटींचा वापर करू. मदत आवश्यक असणाऱ्या लोकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले जातील. मी वैयक्तिकरित्या संपूर्ण ऑपरेशनचे निरीक्षण करत आहे.” (पीटीआय फोटो)
हेही वाचा: Photos : 7000 कार्स, 2250 कोटींचा राजवाडा, अफाट श्रीमंत असलेल्या ब्रुनेईच्या पंतप्रधानांची PM मोदी घेणार भेट!

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”