-
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दारुस्सलाम येथील बंदर सेरी बेगवान येथे पोहोचले. एका औपचारिक गार्ड ऑफ ऑनरने त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या उपस्थितीचा सन्मान केला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दारुस्सलाममध्ये गार्ड ऑफ ऑनर दरम्यान ब्रुनेईचे क्राउन प्रिन्स हाजी अल-मुहतादी बिल्ला यांच्यासमवेत. हा दोन देशांतील परस्पर आदराचा क्षण आहे.
-
ब्रुनेईमधील भारतीय समुदाय एका हॉटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी जमल्याचे पाहायला मिळाले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.
-
भारताच्या तिरंग्या रंगात वेषभूषा केलेले ब्रुनेईमधील भारतीय समुदायाचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी हॉटेलमध्ये एकत्र आल्याने परदेशातील भारतीयांची एकता आणि त्यांच्या मातृभूमीवरील प्रेमाचे दर्शन झाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनेई दारुस्सलाम येथे भारतीय उच्चायुक्तालयाच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या दूतावास फलकाचे उद्घाटन केले.
-
पीएम मोदींचे ब्रुनेई दारुस्सलामचे विमान मंगळवारी (४ सप्टेंबर) नवी दिल्लीहून निघाले होते. त्यांच्या ब्रुनेई देशाच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
-
ब्रुनेईमध्ये पंतप्रधान मोदींचे भारतीय समुदायाकडून मनापासून स्वागत करण्यात आले, त्यावेळेचा आणखी एख फोटो.
-
ब्रुनेईच्या बंदर सेरी बेगवान येथील ओमर अली सैफुद्दीन मशिदीमध्ये पंतप्रधान मोदींना भेटवस्तू देण्यात आली. त्यानंतर त्यांनी फोटोसाठी पोज दिली.
-
बंदर सेरी बेगवान येथे भारतीय दूतावास उच्चायुक्तालयाच्या नवीन परिसराचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले, यामुळे ब्रुनेईमधील भारताची राजकीय स्थिती मजबूत झाली.
-
बंदर सेरी बेगवान येथे पंतप्रधान मोदींनी ब्रुनेईच्या ओमर अली सैफुद्दीन मशिदीमध्ये फेरफटका मारला, ही मशिद ब्रुनेईच्या समृद्ध संस्कृतीचे आणि वारशाचे प्रतीक आहे.
-
(सर्व फोटो साभार: पीटीआय)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”