-
पंतप्रधान मोदी सध्या ब्रुनेई आणि सिंगापूर दौऱ्यावर आहेत, काल त्यांचे सिंगापूरमध्ये आगमन झाले.
-
यावेळी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले.
-
भारतीय समुदायाच्या नागरिकांनी यावेळी मोठा उत्साह दाखवला.
-
यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भारतीय लोक विविध स्वागत फलक दाखवत जमले होते.
-
पंतप्रधानांच्या स्वागतावेळी भरतनाट्यम नृत्यही सादर करण्यात आले.
-
तर ढोलपथकही हजर होते.
-
यावेळी भारतीय संस्कृतीने झालेलं स्वागत पाहून मोदींनाही त्यात सहभाग घेण्याचा मोह झाला.
-
लगेचच पंतप्रधानांनी पथकाचा ढोल वाजवला.
-
यावेळी पंतप्रधान मोदी खूप आनंदी दिसले.
-
पंतप्रधान मोदींचा ढोलवादन करतानाचा आणखी एक फोटो
-
यावेळी महाराष्ट्रीयन नागरिकांनी तिथे लेझीम खेळून मोदींचे अनोखे स्वागत केले.
-
भारताच्या पंतप्रधानांना पाहून सर्व नागरिकांमध्ये यावेळी वेगळाच उत्साह दिसून आला.
-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (४ सप्टेंबर) दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर पोहोचले आहेत.
-
सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त शिल्पक अंबुले, सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त सायमन वोंग आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. (Photos Source: Narendra Modi/X)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य