-
तुम्ही जर मुंबईकर असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
-
मुंबई मेट्रो ३ आता लवकरच तुमच्या सेवेत दाखल होणार आहे.
-
यासंबधीची सर्व तयारी आता पूर्ण झालेली असून प्रशासन पुढील प्रक्रिया राबवण्यास सज्ज झाले आहे.
-
दरम्यान, मुंबईतील मेट्रो ३ मध्ये आरे- बीकेसीमधील साडेबारा किलोमीटरची मार्गिका आता फेऱ्या घेण्यासाठी तयार आहे.
-
आरे- बीकेसी दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.
-
या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे.
-
दरम्यान, आरे- बीकेसी या मार्गिकेवर दररोज ९६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
-
‘मुंबई मेट्रो ३’ ची काल मंगळवारी (२४ सप्टेंबर) चाचणीही पार पडली आहे.
-
या मेट्रोमुळे आरे ते बीकेसीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रोजच्या ट्रॅफिकच्या समस्येतून सुटका होणार आहे.
-
(सर्व फोटो साभार- MMRCL Website & X Handle)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ