-
पुण्यातील बावधनमध्ये आज (२ ऑक्टोबर) सकाळी ६.४५ च्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे.
-
हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी या घटनेनंतर दिली आहे.
-
हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
-
हेलिकॉप्टर क्रॅश होण्याच्या आधी बराच वेळ आकाशात घिरट्या घेत होतं. मात्र, त्यानंतर ते क्रॅश झालं आणि त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.
-
क्रॅश झालेलं हेलिकॉप्टर हे पु्ण्यावरून मुंबईतील जुहूच्या दिशेने जाण्यासाठी ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं.
-
हेलिकॉप्टर केसळल्याच्या या घटनेची आता डीजीसीए चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
-
समोर आलेल्या वृत्तानुसार, दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी काही अडचणी आल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे
-
हेलिकॉप्टर केसळल्याच्या घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.
-
हे हेलिकॉप्टर पुण्यातील बावधनमधील डोंगळाळ भागात सकाळी सकाळी ६.४५ च्या सुमारास कोसळले आहे.
-
पोलिसांच्या माहितीनुसार या अपघातामध्ये गिरीशकुमार पिल्लई, प्रितमचंद भरद्वाज व परमजीत या तिघांचा मृत्यू झाला आहे. (फोटो सोर्स-सर्व फोटो RNO)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा