-
कोलकाता येथे दरवर्षी दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, परंतु यावेळी दुर्गा मंडळांच्या सजावटी आणि भव्यतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (पीटीआय फोटो)
-
दुर्गा पूजा हे केवळ धार्मिक विधी आणि दुर्गा मातेच्या उपासनेचे प्रतीक नाही तर कला, संस्कृती आणि नवनिर्मितीचा अद्भुत संगम देखील आहे. कोलकात्यातील दुर्गा मंडळं दरवर्षी नवीन आणि अनोख्या थीमसह देखावे तयार करतात, हे देखावे उत्सवाच्या सौंदर्यात जास्त भर घालतात. (पीटीआय फोटो)
-
यावर्षी कोलकात्यातील अनेक दुर्गा मंडळांच्या खास थीमसह साकारण्यात आलेल्या देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका जुन्या ट्रान्झिस्टर रेडिओप्रमाणे एका मंडळाने सजावट केली आहे. जी लोकांच्या जुन्या आठवणींना ताज्या तर करतेच आहे शिवाय सर्जनशीलतेचे उदाहरणही बनत आहे. (पीटीआय फोटो)
-
त्याच वेळी, आणखी एका मंडळाने पारंपरिक बंगाली चटई ‘मदुर’ने सजवण्यात आलेला सेट उभारला आहे, ज्यामध्ये दुर्गा मातेची मूर्तीही याच चटईपासून बनवण्यात आली आहे. (पीटीआय फोटो)
-
हा देखावा पर्यावरण-संवेदनशीलता आणि पारंपरिक कारागिरीला प्रोत्साहन देणारा ठरत आहे. (पीटीआय फोटो)
-
परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम दुर्गापूजा मंडळांमध्ये पाहायला मिळतो. भगवान जगन्नाथ मंदिराच्या धर्तीवर हा देखावा बांधण्यात आला आहे. (पीटीआय फोटो)
-
तर काही ठिकाणी रिसायकल केलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. पर्यावरण रक्षणासाठी लोकांना जागरूक करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. (पीटीआय फोटो)
-
यंदाच्या दुर्गापूजा उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘थ्री डायमेंशनल युनिव्हर्स’ थीम असलेला पंडाल, जो महापंचमीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी पाहिला. (पीटीआय फोटो)
-
यावेळी समाज आणि पर्यावरणाप्रती जनजागृतीचा संदेशही पँडलच्या डिझाइनमध्ये अंतर्भूत आहे. उदाहरणार्थ, हिरवाईला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाविषयी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी एक पंडाल वनस्पतींनी सजवण्यात आला आहे. (पीटीआय फोटो)
-
दरम्यान, दरवर्षी कोलकाता येथे दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि यावेळी देखील शहरातील रस्त्यांवर उत्सवाचा उत्साह दिसून येतो. (पीटीआय फोटो)
-
लोक आपापल्या समुदायाच्या पूजा पंडालांना भेट देत आहेत, जिथे वेगवेगळ्या थीमवर तयार केलेल्या पंडालमध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते. (पीटीआय फोटो)
-
कोलकाता व्यतिरिक्त आसामच्या नागाव जिल्ह्यात ‘टायटॅनिक’ जहाजाच्या आकाराचे पंडाल तयार केले जात आहे, जे यंदाच्या उत्सवाचे एक आकर्षक केंद्र बनणार आहे. नावीन्यपूर्ण आणि सर्जनशीलतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. (पीटीआय फोटो)
हेही वाचा – Photos : गायिका सुनिधी चौहानचा राॅकिंग अंदाज, फोटो झाले व्हायरल…

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”