-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ सीमा सुरक्षा दल (BSF), लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
-
यावेळी त्यांनी जवानांना मिठाई भरवून त्यांच्याशी संवाद साधला.
-
पंतप्रधान मोदींनी सलग ११ वर्षांपासून या परंपरेचे पालन करत आले आहेत.
-
पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी प्रत्येक वर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे.
-
२०१४ मध्ये पंतप्रधान बनल्यानंतर मोदींनी पहिल्यांदा सियाचीनमध्ये तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.
-
त्यानंतरच्या वर्षांत त्यांनी विविध ठिकाणी, जसे की जम्मू-काश्मीर, कारगिल, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश येथेही सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे.
-
या परंपरेचा उद्देश म्हणजे भारतीय जवानांच्या मनोबलाला उंचावणे आणि त्यांच्या बलिदानाचे कौतुक करणे असल्याचे मोदी नेहमी सांगतात.
-
कच्छमध्ये जवानांना संबोधित करताना मोदींनी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि देशाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
-
त्यांनी म्हटले की, “जेव्हा जग तुमच्याकडे पाहते तेव्हा ते भारताचे सामर्थ्य पाहते.”
-
याशिवाय, त्यांनी भारतीय संरक्षण उद्योगाच्या वाढत्या क्षमतांचा उल्लेख केला, ज्यामुळे भारत आता अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे.
-
(सर्व फोटो साभार- नरेंद्र मोदी/एक्स)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख