-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या चर्चेदरम्यान ११ संकल्प सांगितले.
-
नागरीक असो वा सरकार सर्वांनी आपल्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे
-
प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समाजाला विकासाचा लाभ मिळाला पाहिजे. सर्वांच्या साथीने, सर्वांचा विकास झाला पाहिजे.
-
भ्रष्टाचाराच्या प्रती शून्य सहिष्णुता असावी. भ्रष्टाचाऱ्याची सामाजिक स्वीकार्यता नसली पाहिजे.
-
देशाचा कायदा, नियम, परंपरांचं पालन करण्यास देशाच्या नागरिकांना गर्व असला पाहिजे.
-
गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती असावी.
-
देशाच्या इतिहासावर गर्व असावा
-
देशाच्या राजकारणात घराणेशाहीतून मुक्ती मिळो.
-
संविधानाचा सन्मान व्हावा. संविधानाचे हत्यार बनू नये.
-
संविधानाच्या भावनेप्रती समर्पण ठेवून ज्यांना आरक्षण मिळतंय ते कोणी रोखू नये.
-
संविधानाच्या निहित भावना We the People हा मंत्र घेऊन पुढे जाऊ… विकसित भारताचं स्वप्न सदनातील प्रत्येकाचं असलं पाहिजे.
-
२०४७ मध्ये भारत जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल तेव्हा विकसित भारत असला पाहिजे.
(सर्व फोटो सौजन्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी / इंस्टाग्राम, पेक्सएल्स, पिक्साबे )