-
मुंबईतील एलिफंटा बेटाकडे जाणारी प्रवासी बोट बुधवारी दुपारी (१८ डिसेंबरला) स्पीडबोटीला धडकल्याने उलटली. (एक्स्प्रेस फोटो)
-
या फोटोंमध्ये सहा ते सात प्रवाशांसह एक छोटी बोट पाण्यातून जात असल्याचं दिसत आहे. हाय-स्पीड बोट नंतर यू-टर्न घेते आणि या बोटला जोरदार धडक देते. (एक्स्प्रेस फोटो)
-
इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. (पीटीआय फोटो)
-
या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर इतर प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली.
-
रोज दुपारी ३ वाजता एलिफंटा गुहांसाठी निघणाऱ्या या फेरीत ८० प्रवासी होते. नीलकमल असे या बोटीचे नाव आहे.
-
नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल, यलो गेट पोलीस आणि स्थानिक मासेमारी नौका यांच्या मदतीने बचावकार्य सुरू असून, घटनास्थळी तीन पथके तैनात आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
-
बचावलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांची पहिली तुकडी गेटवे ऑफ इंडिया येथे संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास पोहोचली. (एक्स्प्रेस फोटो)
-
या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. (एक्स्प्रेस फोटो)
-
या घटनेनंतर गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेर लोक मोठ्या संख्येने जमले. (एक्स्प्रेस फोटो)
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य