-
प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री भीषण हल्ला झाला. त्याच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका चोराने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होऊन सध्या तो रुग्णालयातच डॉक्टरांच्या निगराणी खाली आहे. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
इमारतीत असलेल्या जिन्यावरून चढून आला व सैफचा धाकटा मुलगा जहांगिरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. त्यावेळी घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून सैफ अली खानच्या घरात काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा या सैफचा मुलगा जहांगीर याला उचण्यासाठी धावल्या असता आरोपीने त्यांच्यावर हेक्सा ब्लेडसारख्या वस्तूने हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान व करीना दोघेही तेथे पोहोचले. त्यावेळी हल्लेखोराने हेक्सा ब्लेडसारख्या हत्याराने सैफवर हल्ला केला. तैमुरची आया लिमा या देखील मध्ये पडल्या. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
दरम्यान, त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ तपासकार्य सुरू केले. यामध्ये अभिनेत्री करीना कपूरच्या चौकशीपासून ते त्यांच्या घरात काम करणाऱ्या मदतनीसांचीही चौकशी करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून तो चोरीच्या उद्देशाने घरात शिरला असल्याचं स्पष्ट झालं. पण हल्ल्यानंतर तो तत्काळ आपत्कालीन मार्गाने पसार झाला होता. त्यामुळे सैफ अली खानच्या सतगुरू शरण इमारतीच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना त्याने कपडे बदलल्याचे लक्षात आले. तसंच, तो वांद्रे आणि तेथून दादरला गेल्याचंही पोलिसांना आढळून आलं. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी तपासकार्य सुरूच ठेवलं. या तपासकार्याचा भाग म्हणून दोन संशयित आरोपींनाही अटक कऱण्यात आली होती. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून दोन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले होते. परंतु, त्यांच्या चौकशीतून ते हल्लेखोर नसल्याचं स्पष्ट झालं. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
अखेर पोलिसांनी त्यांचं तपासकार्य पुन्हा वेगाने वाढवलं. दरम्यान, घोडबंदर हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या एका कामगारांच्या छावणीमध्ये तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातील कासारवडवली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु छावणीमध्ये येथीलआढळून आला नाही. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा तपास करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तो येथील कांदळवन परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कांदळवन भागामध्ये असलेल्या एका तरुणाची मदत घेतली. पंरतु हल्लेखोराने मोबाईल बंद करून ठेवला होता. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
त्यामुळे त्याचा कांदळवनातील जंगलामध्ये शोध लागणे कठीण झाले होते. मध्यरात्री त्याने त्याचा मोबाईल काही वेळासाठी सुरू केला. त्यानंतर पोलिसांना त्याचा शोध लागला. त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्याला आता मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (३०) बांगलादेशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे याप्रकरणी पारपत्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली असून त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखा, तसेच मुंबई पोलिसांच्या १०० जणांची विविध पथके तयार केली होती. आरोपी बेकायदेशीररित्या भारतात दाखल झाला असून त्याने विजय दास हे खोटे नाव सांगितले होते. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित