-
दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राजधानीतील ७० विधानसभा जागांवर मतदान होत आहे, जिथे १.५६ कोटी मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. या निवडणूक लढाईत आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पार्टी (भाजपा), काँग्रेससह २९ राजकीय पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उlरवले आहेत. (पीटीआय फोटो)
-
सत्ताधारी आप आणि काँग्रेसने सर्व ७० जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर भाजपने ६८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि मित्रपक्ष जेडीयू आणि एलजेपी-आर यांना २ जागा दिल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी, राजकारणी आणि अधिकाऱ्यांनीही त्यांच्या मतदान केंद्रांना भेट दिली. चला, मतदानादरम्यानचे खास फोटो पाहूया आणि या लोकशाही उत्सवात कोणत्या मोठ्या व्यक्ती सहभागी झाल्या ते पाहूयात. (पीटीआय फोटो)
-
दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान नवी दिल्लीतील मतदान केंद्रावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मतदान करताना. (पीटीआय फोटो)
-
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) आर एलिस वाझ यांनी टिळक मार्ग येथे मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनीही मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू हे देखील मतदान करण्यासाठी पोहोचले. (पीटीआय फोटो)
-
भारताचे सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांनीही दिल्लीत मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी मतदानाचा हक्क बजावला. (पीटीआय फोटो)
-
पंतप्रधानांचे प्रधान सचिव प्रमोद कुमार मिश्रा यांनीही मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
राजकीय नेत्यांनी मतदान केले.
निजामुद्दीनमध्ये मतदान केल्यानंतर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी त्यांच्या बोटाला शाई लावल्याचे दाखवत फोटो काढला. (पीटीआय फोटो) -
दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या उमेदवार आतिशी यांनी कालकाजीमध्ये मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतला. (पीटीआय फोटो)
-
दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनीही मतदान केंद्रावर मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि मुलगा रायहान वाड्रा यांच्यासह मतदान करण्यासाठी लोधी इस्टेट येथे पोहोचल्या. (पीटीआय फोटो)
-
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील मतदान करण्यासाठी पोहोचले होते. (पीटीआय फोटो)
-
मतदान केल्यानंतर आप नेते गोपाल राय यांनीही स्वतःचा फोटो काढला आणि त्यांनी शाई लावलेलं बोट दाखवलं. (पीटीआय फोटो)
-
मतदानानंतर आप नेते संजीव झा यांनीही शाई लावलेलं बोट दाखवलं. (पीटीआय फोटो)
-
भाजपा नेत्या बांसुरी स्वराज यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. (पीटीआय फोटो)
-
भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. (पीटीआय फोटो)
-
भाजप नेते रामलाल यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. (पीटीआय फोटो)
-
भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. (पीटीआय फोटो)
-
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार परवेश साहिब सिंग वर्मा त्यांच्या कुटुंबासह नवी दिल्लीतील एका मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले. (पीटीआय फोटो)
-
आप नेते सत्येंद्र जैन हे देखील त्यांच्या कुटुंबासह मतदान करण्यासाठी एका मतदान केंद्रावर पोहोचले. (पीटीआय फोटो)
-
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आप नेते मनीष सिसोदिया त्यांच्या पत्नी सीमा सिसोदिया यांच्यासह मतदान केंद्रावर पोहोचले. (पीटीआय फोटो)
-
मतदानानंतर भाजप उमेदवार रमेश बिधुरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. (पीटीआय फोटो)
-
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवी दिल्लीतील एका मतदान केंद्रावर मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि त्यांच्या पत्नी सुनीता द्विवेदी यांनी कामराज लेनमध्ये मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी दिल्लीत मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
अनेक केंद्रीय मंत्री आणि नोकरशहांनीही मतदान केले
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी तुघलक क्रेसेंट परिसरात मतदान केले. (पीटीआय फोटो) -
केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांनीही मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
उद्योगातील प्रमुख व्यक्तींनीही मतदान केले
हॅवेल्स इंडियाचे एमडी अनिल राय गुप्ता यांनी मतदान केले. (पीटीआय फोटो) -
बर्जर पेंट्सचे अध्यक्ष कुलदीप सिंग धिंग्रा यांनी मतदान करून लोकशाहीत आपली भूमिका बजावली. (पीटीआय फोटो)
-
महिला नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही मतदान केले
दिल्ली हज समितीच्या अध्यक्षा कौसर जहाँ यांनी मयूर विहारमध्ये मतदान केले. (पीटीआय फोटो) -
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनीही मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनीही दिल्लीत मतदान केले. (पीटीआय फोटो)
हेही पाहा- संतोष जुवेकर ते सारंग साठ्ये, ‘छावा’ चित्रपटामध्ये झळकणार ‘हे’ मराठी कलाकार
![sant Tukaram maharaj suicide news in marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/cats_5f1be7.jpg?w=300&h=200&crop=1)
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी