-
Shreemant Dagadusheth Halwai Ganapati Pune: कोवळ्या उन्हाच्या सूर्यकिरणांनी शनिवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला चक्क महाभिषेक केला.
-
ठीक सव्वाआठ वाजता सूर्यकिरणे गणरायाच्या मूर्तीवर पडली आणि ‘जय गणेश’चा जयघोष करत भाविकांनी हा सुखसोहळा आपल्या मोबाईलमध्ये टिपला.
-
माघ गणेश जन्माच्या उत्सवानंतर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे ‘श्रीं’ च्या मूर्तीवर पडतात.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शनिवारी सकाळी भाविकांनी हा सोहळा अनुभविला.
-
सकाळी सव्वाआठ ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला.
-
गणरायाच्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती.
-
त्याबरोबरच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या चांदीच्या मूर्तींनाही सूर्यकिरणांनी स्पर्श केला.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने सूर्याची किरणे मूर्तीवर पडतात.
-
मंदिराची रचना उंच असल्याने गाभाऱ्यात सूर्यकिरणांचा या वेळी प्रवेश होतो.
-
माघ गणेशजन्माच्या उत्सवानंतर उत्तरायणामध्ये हा सोहळा दरवर्षी अनुभवायला मिळतो. भाविकांना हा सोहळा गणेशजयंतीनंतर एका आठवडयामध्येच अनुभवता आला असे महेश सूर्यवंशी (कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती) म्हणाले.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच