-
मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये आज सकाळी मोठी आग लागली होती.
-
ओशिवरा फर्निचर मार्केट हे मुंबईतील सर्वात मोठं मार्केट असून गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना घडली आहे.
-
ही आग जोगेश्वरी पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील ए१ दरबार रेस्टॉरंटजवळील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये सकाळी ११:५२ वाजता आग लागली.
-
आग पसरल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने आगीला लेव्हल २ ची आग (मोठी आग) म्हणून घोषित केले.
-
या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला दिल्यानंतर त्यांनी तातडीने आपत्कालीन परिस्थितीत मदत सेवा सुरु केली.
-
आगीची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
-
दरम्यान, ३१ जानेवारीला घाटकोपर पूर्व येथील कैलास प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास भीषण आग लागली होती.
-
(सर्व फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”