-
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती आहे. (Photo: Ajit Pawar/X)
-
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.(Photo: Eknath Shinde/X)
-
शिवजयंतीचा उत्साह राज्यभर पाहायला मिळतो आहे. (Photo: Eknath Shinde/X)
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर मराठा महासंघाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Photo: Eknath Shinde/X)
-
यावेळी पारंपारिक शिवजन्मोन्सव सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली गेली. (Photo: Ajit Pawar/X)
-
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Photo: Devendra Fadanvis/X)
-
यावेळी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्यासमवेत असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केले. त्यानंतर भाषणांचा कार्यक्रम पार पडला. (Photo: Devendra Fadanvis/X)
-
शिवरायांचे किल्ले आमच्यासाठी कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे- देवेंद्र फडणवीस
जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आजपासून पाच वर्षांनी छत्रपती शिवरायांचा ४०० वा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. शिवनेरीवरती आल्यावर आपल्याला जी स्वराज्याची स्फूर्ती मिळते ते घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व लोक येथे येत असतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरी किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले. (Photo: Devendra Fadanvis/X) -
“छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्यासाठी कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. स्वराज्याची राजधानी रायगड येथे अनेक कामे आपण सुरू केले आहेत. मला सांगताना आनंद वाटतो की आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतला आहे. काही झालं तरी अतिक्रमणं तिथं राहणार नाहीत” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Photo: Devendra Fadanvis/X)
-
शिवनेरीच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अजित पवारांनी दिला शब्द
“महाराष्ट्रातील गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थाने दौलत आहेत. हे गड किल्ले आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान आहेत. त्यामुळे या गडकिल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या आघाडी सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. शिवजन्मभूमी शिवनेरीच्या जतन, संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की त्यांनी आम्हाला सूचना केल्या आहेत की या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू द्यायची नाही. हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवनेरी येथील शिवजयंती सोहळ्यादरम्यान म्हणाले. (Photo: Ajit Pawar/X) -
शिवजयंतीसारखा दुसरा शुभ मुहूर्त नाही – एकनाथ शिंदे
“हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांना महत्त्व आहे. पण तमाम शिवप्रेमींसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी शिवजन्माचा मुहूर्त सर्वात अनमोल आहे. शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभ मुहूर्त असू शकत नाही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. काळ कितीही पुढे गेला तरी, कितीही तंत्रज्ञानाच्या बाता मारल्या तरी शिवजी महाराज यांच्यासारखा आदर्श दुसरा कुठला असू शकत नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे शिवनेरी किल्ल्यावर आयोजित जयंती उत्सवात बोलताना म्हणाले.

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?