-
तुम्हाला माहित आहे का की मसाल्याच्या स्वरूपात वापरली जाणारी दालचिनी तुमच्या केसांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते? हो, दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेंट्री गुणधर्म असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात.
-
दालचिनीचा वापर केस गळणे, कोंडा या समस्यांपासून मुक्त होण्यास देखील मदत करतो. तुमच्या केसांची निगा राखण्याच्या दिनचर्येत दालचिनीचा समावेश करून तुम्ही तुमचे केस निरोगी आणि लांब बनवू शकता.
-
दालचिनी आणि दही : केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही दालचिनी आणि दह्याचा हेअर मास्क देखील बनवू शकता. हे करण्यासाठी, एक चमचा दालचिनी पावडर दोन चमचे दह्यामध्ये मिसळा आणि केसांचा मास्क तयार करा. नंतर ते तुमच्या केसांच्या मुळांना २० मिनिटे लावा. यानंतर, तुमचे केस कोमट पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या केसांना पोषक तत्वे मिळतील आणि ते लांब आणि मजबूत होतील.
-
दालचिनी आणि मधाचा वापर : केसांसाठी दालचिनी वापरण्यासाठी तुम्ही दालचिनी आणि मधाची पेस्ट बनवू शकता. यासाठी दोन चमचे दालचिनी पावडर तीन चमचे मधात मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट तुमच्या डोक्यावर लावा आणि तीस मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर, थंड पाण्याने केस चांगले धुवा.
-
दालचिनी आणि खोबरेल तेल : दालचिनी आणि खोबरेल तेल एकत्र वापरणे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ते वापरण्यासाठी, एक चमचा दालचिनी पावडर दोन चमचे खोबरेल तेलात मिसळा आणि ते तुमच्या टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. नंतर वीस मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. हे तुमचे केस मजबूत आणि चमकदार बनविण्यात मदत करेल.

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल