-
गुढीपाडवा व नववर्षाचे औचित्य साधून गुढीपाडवा शोभायात्रा मंडळ आणि संस्कार भारती पालघर यांच्यावतीने “सूर पहाटेचे” व गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन समितीतर्फे करण्यात आले.
-
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला
-
पालघरमध्ये गेल्या २५ वर्षांपासून नववर्षाचे स्वागत निमित्त संगीताचा विशेष कार्यक्रम तसेच २०१० सालापासून यानिमित्ताने शोभायात्रांचे आयोजन केले जात आहे.
-
गुढीपाडवा व नववर्षानिमित्त सूर पहाटेचा कार्यक्रम सकाळी ६ ते ७.३० या वेळेत पालघर येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या आवारात संपन्न झाला.
-
या संगीताच्या कार्यक्रमानंतर सकाळी ७.३० वाजता लक्ष्मीनारायण मंदिरापासून पालघर रेल्वे स्थानकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.
-
या शोभायात्रेत बॅण्ड पथक, लेझिम पथक, तारपा नृत्याचे पथक, भजनमंडळीची पथके सहभागी झाले होते.
-
त्याचबरोबरीने नागरिकांनी आपापल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येत उपस्थित होते.
-
पालघरमधील गणेश मंडळ, सामाजिक शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, जाती संस्था अशा संस्थां बॅनरसह शोभायात्रेत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
-
पालघरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुढीपाडवा निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
-
(सर्व फोटो – लोकसत्ता टीम)

१ एप्रिल राशिभविष्य: अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पा कोणत्या राशीच्या पाठीशी उभा राहणार? कोणाला फायदा तर कोणाची इच्छापूर्ती होणार