-
साडे तीन मुहूर्तांपैकी एक… हिंदू नवर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
ढोल ताशांचा गजर, झांज अन् लेझीमच्या तालावर नटूनथटून पारंपारिक वेषात नववर्षांचे स्वागत करण्यात आले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मिरवणुका, शोभायात्रांमधून एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या मुंबईत दारोदारी उभारण्यात आल्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
यंदाही मुंबईतील गिरगाव परिसरात शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात, जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
या शोभायात्रांमध्ये अनेक महिला नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दागिण्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावा सहभागी झाल्या होत्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
या फोटोमध्ये मी मराठी, अभिमान मराठी, अभिजात मराठी असा संदेश देणारा महाराष्ट्राचा नकाशा असलेला फलक पाहायला मिळाला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
पुणेरीसह विविध ढोल ताशा पथके, महिलांचे विशेष झांजपथक, विविध शोभायात्रा रथांचा सहभाग होता. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
महात्मा ज्योतीराव फुले- सावित्रीबाई फुले यांचे फोटोही यावेळी महिलांनी मिरवणुकीत आणल्याचे पाहायला मिळाले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. याठिकाणी २२ फुटांची गुढी उभारण्यात आली. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही शोभायात्रेतील मराठमोळ्या पेहरावातील महिलांची बुलेटस्वारी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
पारंपरिक मराठमोळा पेहराव करुन अनेक महिला बुलेट अन् काही आपल्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या दुचाकी घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
लहानग्यांनीही उत्स्फूर्तपणे या शोभायात्रेत खास वेशभूषा करत सहभाग नोंदवला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस) हेही पाहा- Gudi Padwa 2025 : पालघरमध्ये गुढीपाडवा- नववर्षानिमित्त शोभायात्रा; पारंपरिक कलापथकांचा उत्स्फूर्त सहभाग, पाहा फोटो…

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा