-
भारताची संस्कृती, सभ्यता आणि अध्यात्म याची ओळख जगाला घडवून देणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे.
-
१२ जानेवारी १८६३ रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी होते. आईने घडवलेल्या संस्कारांमुळे विवेकानंद यांचे व्यक्तीमत्त्व घडले. विवेकानंद लहान असताना आपल्या आई वडिलांना विविध प्रकारचे प्रश्न विचारत आणि निरुत्तर करत
-
स्वामी विवेकानंद हे नऊ भावंडांपैकी एक होते. समाजात अशा धर्माची निर्मिती झाली पाहिजे जो जातीभेद नष्ट करेल हा त्यांचा विचार होता
-
स्वामी विवेकानंद यांची जयंती देशभरात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते
-
रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते.
-
स्वामी विवेकानंद यांनी शिकागो या ठिकाणी केलेले भाषण आजही प्रेरणादायी वाटावे असेच आहे
-
स्वामी विवेकानंद यांचे विचार वाचून आजही अनेकांना प्रेरणा मिळते, जगभरात त्यांचे अनुयायी आहेत
-
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र होते, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना विवेकानंद हे नाव दिले
-
एकाग्रतेने वाचन करा, ध्यानधारणा करा यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते असं स्वामी विवेकानंद कायम सांगत

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर