-
प्रत्येकाने कधी ना कधी, कुठे ना कुठे सर्कसच्या तंबूत पाऊल ठेऊन तिथला थरार एकदा तरी अनुभवलेला असतोच! (फोटो : अमित चक्रवर्ती)
-
सर्कस म्हणजे हृदयाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या झुल्यांवरच्या कसरती असतात, हसून लोळायला लावणारी विदुषकांची धमाल असते. (फोटो : अमित चक्रवर्ती)
-
संगीताच्या लयबद्ध तालावर आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटात आकर्षक शारीरिक कौशल्यांचे आणि चापल्याचे विस्मयकारक आविष्कार असतात. (फोटो : अमित चक्रवर्ती)
-
भारतात सर्कस हा व्यवसाय जवळपास १३० वर्षें जुना आहे. (फोटो : अमित चक्रवर्ती)
-
१९९० च्या काळात देशात ३०० सर्कस होत्या. त्या आज कमी होत केवळ २५ च्या आसपास राहिल्या आहेत. (फोटो : अमित चक्रवर्ती)
-
इंटरनेट, ऑनलाइन गेम्सच्या या आभासी जगात आजच्या मुलांना सर्कसचं फारसं आकर्षण वाटत नाही. म्हणून ती पाहायला फारसं कोणी फिरकताना दिसत नाही. सर्कस कंपन्यांनाही वाढता प्रवास खर्च, मैदानाचे भरमसाट भाडे, प्राणी मित्र संघटनांविरुद्ध चाललेले कोर्ट खटले यामुळे आता पूर्वीसारखं आकर्षण न राहिलेली सर्कस चालवण्यात स्वारस्य दिसत नाही. (फोटो : अमित चक्रवर्ती)
-
सर्कस मालक याचं खापर १९९७ साली वन्यप्राण्यांच्या वापरावर आलेली बंदी आणि २०११ साली सर्वोच्च न्यायालयाने लहान मुलांनी सर्कसमध्ये काम करण्यावर घातलेली बंदी यावर फोडतात. (फोटो : अमित चक्रवर्ती)
-
सर्कस हा आपल्या देशात शेकडो वर्षांपासून मनोरंजनाचा भाग बनला असला तरी तिला सरकारने सांस्कृतिक व कला विभागाची मान्यता मिळालेली नाही. (फोटो : अमित चक्रवर्ती)
-
भारतात सर्कस कलाकार क्रीडा व युवा घडामोडींच्या विभागांतर्गत येतात. (फोटो : अमित चक्रवर्ती)
-
असंघटित कामगार असल्यामुळे कोणत्याच सवलती सुविधा या कलाकारांना मिळाल्या नाहीत. त्यांचे कल्याण मंडळदेखील नाही. (फोटो : अमित चक्रवर्ती)
-
या कलाकारांचे उत्पन कामाप्रमाणे आठ ते २० हजारांच्या दरम्यान असते. (फोटो : अमित चक्रवर्ती)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित