-
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी सर्वाजनिक ठिकाणी गर्दी करण्यावर आणि सार्वजनिक वाहतुकीबरोबर मॉल, दुकाने आणि इतर गोष्टी बंद करण्याचा आदेश देश लॉकडाउनची घोषणा केली आहे. या लॉकडाउनमुळे लाखो लोकं घरातच आहेत. असं असलं तरी या लॉकडाउनमुळे काही सकारात्मक गोष्टीही समोर येत आहे. लॉकडाउनमुळे कंपन्या, उद्योग धंदे, वाहतुक मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याने वायू प्रदुषणामध्ये घट झाली आहे. भारतामध्येही २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम पर्यावरणावर झाल्याचे दिसून येत आहे. ओदिसामध्ये कार्यरत असणारे सरकारी अधिकारी सुशांत नंदा यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो ट्विट केला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा फोटो हिमाचलमधील धौदाधर पर्वतरांगांचा आहे. हा फोटो पंजाबमधील जलंदरमधून काढण्यात आल्याचे सुशांत यांनी म्हटलं होतं. “निसर्ग काय आहे आणि आपण काय करुन ठेवलयं हे या फोटोतून दिसत आहे. हा फोटो आहे हिमालचमधील धौदाधर पर्वतरांगाचा. या पर्वतरांगा पंजाबमधील जलंदरमधून ३० वर्षानंतर दिसत आहेत. मागील ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हवेतील प्रदुषणाचा स्तर इतका कमी झाला आहे. या दोन्ही जागांमधील अंतर अंदाजे २०० किलोमीटर आहे,” असं ट्विट नंदा यांनी केलं होतं. मात्र आता याच ट्विटच्या पार्श्वभूमीवर लोकांनी मिम्सचा पाऊस पाडला आहे. चला पाहूयात असेच काही व्हायरल मिम्स…
-
‘सध्या प्रदुषण एवढं कमी आहे की’ असं म्हणत फोटो शेअर करण्याचा ट्रेण्ड सध्या सोशल मिडियावर दिसत आहे. यामध्ये आपल्या शहरातील प्रदुषण एवढं कमी आहे की अगदी काही शे किलोमीटर दूरच्या गोष्टीही दिसत आहेत, असे मजेशीर दावे करणारे मिम्स शेअर केले जात आहेत. अर्थात उपहासात्मक पद्धतीने भाष्य करणारा हा ट्रेण्ड व्हायरल झालेला असल्याने अनेकांनी मॉर्फ केलेले, एडिटींग केलेले फोटो अपलोड केले आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकजण या भन्नाट ट्रेण्डमध्ये आपली क्रिएटीव्हीटी वापरुन मजेदार फोटो पोस्ट करताना दिसत आहेत.
-
भारतातून जगातील सगळ्यात उंच इमारत असणारी 'बुर्ज खलिफा' दिसू लागली म्हणे…
-
दिल्लीतून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दिसू लागलं.
-
भोपाळमधून थेट गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' दिसू लागलं
-
मुंबईतून कराची दिसू लागली…
-
नेपाळमधून ऑस्ट्रेलिया दिसतय म्हणे…
-
थेट परग्रहावरील एलियन्स काहींना दिसू लागले आहेत.
-
यांच्या खिडकीतून मंगळ आणि चंद्र एकाच वेळी दिसू लागलाय…
-
यू कान्ट सी मी म्हणणारा जॉन सीनाही दिसू लागलाय
-
शिमल्यामधून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसू लागलीय
-
आकाशात सर्व धर्मीय देव दिसू लागलेत.
-
चेन्नईमधून जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट दिसू लागल्याचा अजब दावा
-
घरातूनच दिसतोय 'बुर्ज खलिफा'
-
यांना तर थेट भविष्य दिसू लागलयं
-
घ्या काय बोलायचं… म्हणजे कोलकात्यामधून ताजमहाल दिसू लागलय
-
यांना पण भारतातून दिसू लागलाय 'बुर्ज खलिफा'. बरं हे सर्वाधिक चर्चेतील ट्विट ठरलं आहे. आणि येथूनच हा ट्रेण्ड व्हायरल झालाय
-
यांना दुसऱ्या मजल्यावरुन चीनची भिंत दिसतेय
-
भिवंडीमधून महाबळेश्वर दिसतयं.
-
यांना थेट ३० वर्षांनंतरचं दिसू लागलयं.
-
केरळमधून ब्राझील दिसू लागलयं…
-
सर्व ग्रहतारे दिसू लागलेत…
-
झारखंडमधून बँकॉक दिसू लागलय
-
बिहारमधून इजिप्त दिसू लागलयं
-
घरातून थेट प्लुटो दिसू लागलाय
-
मुंबईतून अंतराळातील ब्लॅक होल दिसतोय म्हणे…

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ