-
“भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असं वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केलं आहे. भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. वास्तवातली अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नसून नेपाळी आहेत असं वक्तव्य ओली यांनी केलं आहे. तसंच आपल्याला पंतप्रधान पदावरुन दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत असंही ओली यांनी म्हटलं आहे. ओली यांच्या या वक्तव्यानंतर सोशल नेटवर्किंगवर ते चांगलेच ट्रोल होत आहेत.
-
नक्की काय म्हणाले ओली? – नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे सातत्याने भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
-
“राजपुत्र असलेल्या रामाला आम्ही सीता दिली असं आम्ही आजही मानतो. मात्र आम्ही भारतात असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला सीता दिली नाही. अयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे. मात्र भारतात असलेली अयोध्या खरीखुरी नाही”, असाही दावा ओली यांनी केला. “भारतातली अयोध्या खरी असेल तर तिथला राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसा येऊ शकतो ?” असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास नेपाळमध्ये झाल्याचाही दावा ओली यांनी केला.
-
इतकंच नाही तर नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार केला गेल्याचंही ओलींनी म्हटलं आहे. याआधी करोना संसर्गावरुनही त्यांनी भारतावर टीका केली होती. भारतातून येणार करोनाचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा जास्त घातक आहे असं त्यांनी म्हटलं होतं.
-
काही दिवसांनी ते हे ही म्हणतील…
-
ओलींनी व्हॉट्सअपवर वाचलं…
-
तुमचं आहे तर कागद दाखवा…
-
भारतीयांना पडलेला प्रश्न…
-
काय प्रॉब्लेम काय आहे…
-
नेपाळचा नवा नकाशा…
-
सारं सारं सारं काही नेपाळ…
-
नेपाळच्या नजरेतून जग…
-
एवढा लोकं संताप व्यक्त करतात तरी…
-
त्याच्या पोटावर बाण मारा…
-
ओलींंवर विरोधकही संतापले – “पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांनी अशाप्रकारची वक्तव्य करून नये. पंतप्रधान भारत आणि नेपाळमध्ये असलेला तणाव कमी करण्याऐवजी ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं मत राष्ट्रीय प्रजातांत्री पार्टीचे सह अध्यक्ष कमल थापा यांनी व्यक्त केलं. त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”