-
राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरु झाली आहे. अयोध्येमधील अनेक घरं, भिंती आणि खांबांवर रंगरंगोटी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी प्रभू राम आणि रामायणातील प्रसंगांची चित्रे काढण्यात आली आहेत.(Photo: Twitted by Twitter/ANI)
-
हे पाहा भवगान श्री कृष्णाचे भिंतीवर काढलेले सुंदर चित्र(Photo: Twitted by Twitter/ANI)
-
याला म्हणतात लार्जर दॅन लाइफ चित्र… (Photo: Twitted by Twitter/muna_biswa)
-
अनेक रस्त्यांवरील खांब, पिलर, पूल आणि सर्वाजनिक ठिकाणीवरील वस्तूंचे शुशोभिकरण करण्यात येत आहे.(Photo: Twitted by Twitter/ANI)
-
अगदी साध्या चित्रांपासून ते ग्राफीटीसारखी चित्रेही काढण्यात येत आहेत. (Photo: Twitted by Twitter/ANINewsUP)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शेकडो कामगार शहराच्या शुशोभिकरणाचे काम करत आहेत.(Photo: Twitted by Twitter/ANI)
-
हे आणखीन एक सुंदर चित्र…(Photo: Twitted by Twitter/PK_Official_4U)
-
रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कुंपणांच्या भिंतीवरही सुरेख चित्र रेखाटण्यात आली आहेत. (Photo: Twitted by Twitter/ANI)
-
अशाप्रकारे अयोध्येमधील शेकडो भिंतींनी कात टाकली असून नवीन आकर्षक स्वरुप त्यांना मिळालं आहे(Photo: Twitted by Twitter/priyagupta999)
-
सुंदर चित्रे काढल्याने संपूर्ण परिसराला अप्रतिम लूक आला आहे. (Photo: Twitted by Twitter/ANINewsUP)
-
दुकाने, घरे सर्व काही 'श्री राम'मय झालं आहे.(Photo: Twitted by Twitter/ANINewsUP)
-
घरांनाही रंग देण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी परवानगी न घेता रंग दिल्याने स्थानिकांनी थेट पोलिसांकडे तक्रार केल्याचे प्रकारही समोर आले आहेत(Photo: Twitted by Twitter/muna_biswa)
-
हा फोटोही आयोध्येमधील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या खांबांवरील कलाकृतीचे दर्शन घडवत असल्याचे सांगत व्हायरल होत आहे.(Photo: Twitted by Twitter/PK_Official_4U)
-
भगवान हनुमानाचे चित्र रेखाटताना कलाकार.. (Photo: Twitted by Twitter/AmbuAsokanV)
-
हा संपूर्ण चौकच चित्रांनी भरून गेल्याने अगदीच आकर्षक दिसत आहे(Photo: Twitted by Twitter/priyagupta999)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?