-
१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवलं. तसंच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगण्यात आलं.
-
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली. राम मंदिर भूमिपुजनाच्या पार्श्वभूमिवर पाहूयात काय घडलं होतं त्यावेळी…कारसेवकांनी बाबरी मशिद पाडल्यानंतर भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी बैठकीत चर्चा करताना (फोटो सौजन्य – आर.के.शर्मा)
-
अयोध्येत कारसेवकांनी मशिद पाडल्यानंतर भाजपा नेते मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती एकत्रीत. (फोटो सौजन्य – केदार जैन)
-
बाबरी मशिद पडल्यानंतर उमा भारती व इतर भाजपा नेते (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
कारसेवक बाबरी मशिदीच्या घुमटावर (फोटो सौजन्य – एक्स्प्रेस आर्काईव्ह, मोहन बने)
-
१९ एप्रिल २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशिद प्रकरणात भाजपा नेत्यांवर गुन्हा दाखल करुन खटला चालवण्यात येईल असं जाहीर केलं. (फोटो सौजन्य – प्रवीण जैन)
-
लखनऊ येथील सत्र न्यायाधीशांसमोर बाबरी मशिद प्रकरणाचा खटला दैनंदिन चालेल आणि न्यायाधीशांची बदली होणार नाही असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. (फोटो सौजन्य – प्रवीण जैन)
-
या खटल्यातील साक्षीदारांना दररोज कोर्टात हजर होता येईल याची काळजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयवर सोपवली. खटल्याचा निकाल दोन वर्षात पूर्ण व्हायला हवं असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. (फोटो सौजन्य – प्रवीण जैन)
-
कारसेवकांनी बाबर मशिद पाडली त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह मुख्यमंत्री होते. मात्र जोपर्यंत कल्याण सिंह राजस्थानच्या राज्यपालपदी कायम आहेत तोपर्यंत त्यांच्यावर खटला चालणार नाही. त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर खटला चालवण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं. (फोटो सौजन्य – प्रवीण जैन)
-
याप्रकरणी विनय कटीयार, साध्वी रितंभरा, सतीश प्रधान, चंपत राय बन्सल यांची नावं चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आली. (फोटो सौजन्य – प्रवीण जैन)
-
भाजपा नेत्यांसह १४ जणांवर बाबरी मशिद पतन प्रकरणात खटला चालावा यासाठी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत लखनऊ कोर्टात हा खटला चालवण्याची परवानगी दिली. (फोटो सौजन्य – प्रवीण जैन)
-
भारतीय जनता पार्टीने याप्रकरणावर नेहमी सावध प्रतिक्रीया दिली आहे. (फोटो सौजन्य – प्रवीण जैन)
-
अयोध्येत बाबरी मशिद पडल्यानंतर त्याजागेवर ट्रॅक्टर (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
बाबरी मशिदीच्या ठिकाणी कारसेवक (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
बाबरी मशिद ठिकाणचं एक दृष्य (फोटो सौजन्य – आर.के.शर्मा)
-
बाबरी मशिद पडल्यानंतर घटनास्थळी स्थानिक लोकं (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
कारसेवक बाबरी मशिदच्या ठिकाणी (फोटो सौजन्य – प्रवीण देशपांडे)
-
बाबरी मशिद पतनावेळी घटनास्थळी जमा झालेले कारसेवक (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
बाबरी मशिदीची भिंत पाडताना कारसेवक (फोटो सौजन्य – आर.के.शर्मा)
-
बाबरी मशिद प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी धरणं आंदोलन करणारे आचार्य धर्मेंद्र. (फोटो सौजन्य – हेमंत मेहता)
-
बाबरी मशिद घटनास्थळी कारसेवक आणि पोलीस (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
बाबरी मशिदीच्या घुमटावर चढलेले साधू आणि जमावाला आवर घालण्याच्या प्रयत्नात पोलीस (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
बाबरी मशिद पतनानंतर घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
बाबरी मशिदीच्या वादग्रस्त ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
बाबरी मशिदीवर चालून गेलेल्या कारसेवकांनी पुढच्या काही तासांमध्ये मशिद पाडली होती. (फोटो सौजन्य – आर.के.शर्मा)
-
रामजन्मभूमी आणि वादग्रस्त बाबरी मशिदीच्या ठिकाणी जमा झालेले कारसेवक (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
घटनास्थळावर कारसेवक आणि पोलिस कर्मचारी (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
६ डिसेंबर १९९२ रोजी रोजी बाबरी मशिदीच्या घुमटावर चढलेले कारसेवक (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
अयोध्येतील बाबरी मशिद (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
बाबरी मशिदीच्या खटल्यासंबंधी चर्चा करताना मुस्लीम समुदायाचे नेते जावेद हबीब, नैब इमाम सलुद्दीन ओवैसी, झफर जिलानी व इतर (फोटो सौजन्य – रवी बात्रा)
-
हातात लाठ्या, भाले, त्रिशुळ घेऊन कारसेवक बाबरी मशिदीच्या ठिकाणी (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
All India Babri Masjid rebuilding committee चे नेते पंतप्रधान देवेगौडा यांची भेट घेऊन संसदेतून बाहेर पडताना (फोटो सौजन्य – रवी बात्रा)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य