-
रागाच्या भरात माणूस काहीही करु शकतो असं म्हणतात. ऑस्ट्रेलियामधील एका घटनेने याचा प्रत्यय आला. येथील एका तरुणीने रागाच्या भरात पावणे तीन कोटींच्या गाडीची तोडफोड केली. संतापाच्या भरात या तरुणीने मर्सिडीज-बेन्ज एस ६३ एएमजी कूपची तोडफोड केली. या तरुणीने गाडीच्या काचा तोडल्या आणि स्प्रेने गाडीवर इंग्रजीमधील शिव्या लिहिल्या. (सर्व फोटो: Instagram/shitadelaide वरुन साभार)
-
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार गाडीच्या मालकाने आपल्या घरासमोर ही गाडी पार्क केली होती. दुपारच्या वेळी एक तरुणी आपल्या गाडीतून आली आणि या गाडीवर स्प्रेने शिव्या लिहून गेली. ही मुलगी गाडीमधून उतरली तेव्हा तिच्या हातात स्प्रे कॅन होता असं उपस्थितांनी सांगितलं आहे. (सर्व फोटो: Facebook/Aaron Schintler वरुन साभार)
-
तरुणीने गाडीवर स्प्रे पेंटने फसवणूक करणारा आणि इतर अश्लील शब्द लिहिले आहेत. अनेक ठिकाणी तिने गाडीवर काळा रंगही फासला. (सर्व फोटो: Facebook/Aaron Schintler वरुन साभार)
-
एवढं करुनही तिचा राग शांत झाला नाही म्हणून तिने बेसबॉल बॅटने गाडीच्या काचाही फोडल्या. गाडीचा मालक हा अॅडलेडमधील एक व्यापारी असून त्याने काही दिवसांपूर्वीच ही गाडी विकत घेतली होती. (सर्व फोटो: Instagram/ddick0 वरुन साभार)
-
या गाडीचा मालक तरुणीचा प्रियकर होता. मात्र काही कारणामुळे या दोघांच ब्रेकअप झालं. तरुणीने गाडीवर जे शब्द लिहिले आहेत त्यावरुन या तरुणाने तिला फसवल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचं स्पष्ट होतं आहे. (सर्व फोटो: Facebook/Aaron Schintler वरुन साभार)
-
आपल्या प्रियकराने आपल्याला फसवल्याच्या भावनेतूनच या तरुणीने त्याच्या पावणे तीन कोटींच्या गाडीचे नुकसान केलं. (सर्व फोटो: Facebook/Aaron Schintler वरुन साभार)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य