-
लंडनमध्ये एका ठिकाणी सध्या रस्त्यावर पडलेल्या २९ हजार किलो गाजरांचे फोटो खूपच चर्चेत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर पडलेल्या गाजरांमागील रहस्य काय आहे याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजरं रस्त्यावर का फेकण्यात आली आहेत असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. (फोटो सौजन्य: Twitter/artnet वरुन साभार)
-
व्हायरल झालेले गाजरांच्या ढिगाऱ्याचे फोटो हे दक्षिण लंडनमधील गोल्डस्मिथ्स कॉलेजच्या परिसरातील आहेत. (फोटो सौजन्य: Twitter/lucyvfurneaux वरुन साभार)
-
एका ट्रकमधून ही सर्व गाजरं कॉलेजच्या कॅम्पसला लागू असलेल्या एका चौकात आणण्यात आली. (फोटो सौजन्य: rafaelperezevans dot com वरुन साभार)
-
रेती ओतावी त्याप्रमाणे ट्रकमधून ही गाजरं या चौकामध्ये टाकण्यात आली. (फोटो सौजन्य: Twitter/LadBonnie वरुन साभार)
-
ही गाजरं या चौकात ओतताना अनेकजण नक्की काय चाललं आहे हे पाहत उभे होते. (फोटो सौजन्य: rafaelperezevans dot com वरुन साभार)
-
ही गाजरं चौकात ओततानेच काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य: Twitter/xenogothic वरुन साभार)
-
गाजरं घेऊन आलेल्या ट्रकच्या आकारावरुन गाजरांच्या संख्येचा अंदाज बांधता येतो. (फोटो सौजन्य: Twitter/xenogothic वरुन साभार)
-
या गाजरांबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर गोल्डस्मिथ्स कॉलेजने काही काळानंतर स्वत: यासंदर्भात ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं. (फोटो सौजन्य: rafaelperezevans dot com वरुन साभार)
-
कॉलेज कॅम्पसजवळ पडलेला हा गाजरांचा ढीग एका विद्यार्थ्याच्या इन्सटॉलेशनसाठी असल्याचे गोल्डस्मिथ्स कॉलेजने स्पष्ट केलं आहे. (फोटो सौजन्य: Twitter/presidents वरुन साभार)
-
ग्राउंडिंग प्रकारात मोडणारे हे एक इन्सटॉलेशन म्हणजेच कलाकृती आहे. ही कलाकृती गाजरांपासून साकारण्यात आलीय. राफेल पेरेज इवांस या एमएफए अभ्यासक्रमातील विद्यार्थी आणि काही कलाकारांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे. (फोटो सौजन्य: Twitter/xenogothic वरुन साभार)
-
ही कलाकृती गलोड्स्मिथ्सच्या एमएफए डिग्री शोचा भाग असल्याचेही गोल्डस्मिथ्सने स्पष्ट केलं आहे. (फोटो सौजन्य: Twitter/GeorgeGreenwood वरुन साभार)
-
राफेल पेरेज इवांसने ही गाजरं खाण्याजोगी नसल्याचे सांगितले आहे. यापैकी बहुतांश गाजरांचे तुकडे झाले आहेत. प्रदर्शनानंतर ही गाजरं कॉलेज कॅम्पसजवळून हटवण्यात येणार असून पाळीव प्राण्यांसाठी खाद्य म्हणून वापरण्यात येणार आहेत असंही इवांस म्हणाला. (फोटो सौजन्य: Twitter/lucyvfurneaux वरुन साभार)
-
ग्रामीण जीवन आणि शहरातील जीवनामधील संघर्षावर भाष्य करणारी आपली कलाकृती आहे असं राफेल पेरेज इवांसने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: Twitter/xenogothic वरुन साभार)
-
आपल्या शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी शहराच्या मध्यभागी आपला शेतमाल ओतून निषेध करत असल्याचे संकल्पना या कलाकृतीमागे असल्याचे इवांसने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: Twitter/presidents वरुन साभार)
-
स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार मागील आठवड्यामध्ये मंगळवारी हे प्रदर्शन संपल्यानंतरही ही गाजरं उचलण्यात आलेली नाही. ही गाजरं जनावरांना खाण्यासाठी देणं अपेक्षित होतं. (फोटो सौजन्य: Twitter/SickChirpse वरुन साभार)
-
आता या गाजरांच्या ढिगाऱ्यावर विद्यार्थी फोटो काढताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य: Sky news वरुन साभार)
-
काही विद्यार्थी तर ही गाजरं खाण्याजोगी नसली तरी आपल्या घरी घेऊन जात आहेत. (फोटो सौजन्य: Twitter/presidents वरुन साभार)
-
सोशल मीडियावर या कलाकृतीवरुन दुमत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांनी ही कलाकृती म्हणजे अन्नाची नासाडी करण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे. (फोटो सौजन्य: Twitter/sofiaakel वरुन साभार)
-
ही गाजरं अशापद्धतीने जमिनीवर टाकली नसती तर उपाशी लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेने ती योग्य पद्धतीने गरजुंपर्यंत पोहचलवली असती असं एकाने या फोटोंवर कमेंट करातना म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: Twitter/yasminmetcalfe वरुन साभार)
-
तर काहींनी मात्र कलाकारांचे कौतुक करत त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न शहरातील लोकांसमोर मांडल्याबद्दल आभार मानले आहेत. (फोटो सौजन्य: Twitter/xenogothic वरुन साभार)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य