-
जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचं नाव घेतलं जातं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी या व्यवसायाव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही हातभार लावताना आपल्याला अनेकदा दिसतात.
-
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी अनेकदा सामाजिक विषयांवरही आपलं मत व्यक्त केलं आहे.
-
महिलांसोबत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत नीता अंबानी यांना एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आले होते. पाहूया काय म्हणाल्या होत्या नीता अंबानी.
-
महिलांसोबत होणाऱ्या गुन्ह्यांबाबत नीता अंबानी यांना एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आले होते. पाहूया काय म्हणाल्या होत्या नीता अंबानी.
-
महिलासोबत वाढलेल्या गुन्ह्यांकडे तुम्ही कसं पाहता? असा सवाल हिंदुस्तान टाईम्सच्या एका मुलाखतीदरम्यान करण्यात आला होता.
-
"हे अतिशय दु:खद आहे. महिलांविरोधात वाढणारे गुन्हे हे तर भ्रूणहत्येपासूनच सुरू होतात. आपली भारतीय संस्कृती महिला आणि वयोवृद्धांचा आदर करायला शिकवते," असं त्या म्हणाल्या होत्या.
-
कोणताही देश प्रगतीशील तेव्हा मानता येईल जेव्हा त्या देशातील महिला कोणालाही न घाबरता आपल्या मर्जीप्रमाणे रस्त्यांवर फिरू शकतील, असं आपल्याला वाटत असल्याचं त्या म्हणाल्या.
-
महिलांच्या समस्यांचं निराकरण हे त्यांच्या शिक्षणातच आहे. त्यांनी शिकलं पाहिजे असंही नीता अंबानी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.
-
"जशी पुरूषांमध्ये महत्त्वाकांक्षा असते तशी महिलांमध्येही असते हे समाजानं स्वीकारलं पाहिजे. समाज आणि देशासाठी भरीव योगदान देण्याची क्षमता महिलांमध्येही आहे," असं त्यांनी नमूद केलं.
-
देशात सर्वाधिक दान करणाऱ्यांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश होतो.

स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार