-
सोशल मीडियावर सध्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो व्हायरल होतं आहेत. अनेकांनी रिकाम्या पार्कमध्ये लांबच लांब पर्यंत रांगेत ठेवलेल्या या खुर्च्या पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
खरं तर या खुर्च्या अशापद्धतीने ठेवण्यामागे एक विशेष कारण आहे. मागील शनिवारी अमेरिकेमध्ये करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक विशेष सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
या विशेष प्रार्थनासभेमध्ये करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आठवणीमध्ये २० हजार रिकाम्या खुर्च्या पार्कमध्ये रांगेत ठेवण्यात आल्या होत्या. (फोटो सौजन्य: एपी)
-
अमेरिकेमध्ये करोना संसर्गामुळे आतापर्यंत जवळजवळ दोन लाख जणांना प्राण गमावावे लागले आहेत. तर करोनाचा संसर्ग झालेल्याची संख्या ७० लाखांहूनही अधिक झाली आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
मागील अनेक महिन्यांपासून सर्वाधिक करोनाबाधित असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. (फोटो सौजन्य: Twitter/jribas वरुन साभार)
-
याच करोनाच्या साथीमध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आलेली. (फोटो सौजन्य: Twitter/jribas वरुन साभार)
-
काही जणांनी या ठिकाणी हजेरी लावून रिकाम्या खुर्च्यांवर करोनामुळे मरण पावलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो ठेऊन त्याचे फोटो काढून सोशल नेटवर्किंगवर शेअर केले आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
खरं तर या सर्व खुर्च्या भरलेल्या हव्या होत्या. या खुर्च्यांची संख्या बघून किती जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे याचा अंदाज बांधता येतो असं एका युझरने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: Twitter/CBSNews वरुन साभार)
-
अन्य एका युझरने या खुर्च्यांचा फोटो शेअर करताना आज नॅशनल कोविड-१९ रिमेंबरन्स डे आहे, असं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
अमेरिकेतील दोन लाख ९ हजारहून अधिक लोकांनी प्राण गमावला असून त्यांच्या सन्मानार्थ या २० हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व खुर्च्या व्हाइट हाऊसच्या दिशेने तोंड करुन आहेत, असंही एका युझरने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: Twitter/SurvivorsChange वरुन साभार)
-
हे फोटो पाहून अनेकजण भावूक झाल्याचेही कमेंटमधून दिसून येत आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या ओळखीतल्या कोणला ना कोणाला गमावले आहे. त्यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलेल्या या खुर्च्या आपल्या सर्वांना त्यांची आठवण करुन देत आहेत, असं एका युझरने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक डियोना वारविकनेही या रिकाम्या खुर्च्यांच्या फोटोंवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (फोटो सौजन्य: Twitter/DJKoessler वरुन साभार)
-
या २० हजार रिकाम्या खुर्च्या म्हणजे एक कलाकृती असून मागील सहा महिन्यांमध्ये दोन लाखांहून अधिक जणांचा आस्मिक मृत्यू झाला अशून त्यांचे दुख: यामधून अनुभवता येत आहे असं डियोनाने म्हटलं आहे. या विशेष सभेचे आयोजन करणाऱ्यांमध्ये डियोनाचा समावेश होता. (फोटो सौजन्य: Twitter/KenRoth वरुन साभार)
-
करोना संसर्गावर मात करुन पुन्हा नव्या जोमाने उभ्या राहिलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांसोबत उभं राहण्याचा हा वेळ आहे. या विनाशाचा ज्यांना फटका बसला आहे त्यांना आपण आधार देणं गरजेचं आहे असंही डियोनाने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: Twitter/jribas वरुन साभार)
-
अमेरिकेमध्ये जागतिक लोकसंख्येच्या चार टक्के लोकं राहतात. तर करोनाबाधितांच्या आकडेवारीपैकी २० टक्के रुग्ण हे अमेरिकेतील आहेत. अमेरिकेत अजूनही करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. (फोटो सौजन्य: Twitter/marthaswilson वरुन साभार)

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य