-
अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबुलमध्ये शाळांसाठी वर्ग उपलब्ध नसल्याने उघड्यावरच मोकळ्या आकाशाखाली शाळा भरत आहेत. देशातील शालेय शिक्षणाची परिस्थिती सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. (फोटो सौजन्य: AP Photo/Mariam Zuhaib)
-
जागतिक बँकेने दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमध्ये ३६ हजार शाळा आहेत. मात्र त्यापैकी १८ हजार शाळा या युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या भागांमधील असल्याने त्यांना स्वत:ची इमारत आणि इतर सोयी सुविधा नाहीयत. असं असलं तरी अफगाणिस्तानमध्ये आता मुलांबरोबरच मुलींनाही शालेय शिक्षण देण्यासाठीचा कल वाढताना दिसत आहे. (फोटो सौजन्य: AP Photo/Mariam Zuhaib)
-
अफगाणिस्तानमधील जवळजवळ ३७ लाख मुलं अजूनही शालेय शिक्षणापासून वंचित असल्याचे जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटलं आहे. अफगाणिस्तानमधील शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र याचा फारसा परिणाम झाल्याचे चित्र दिसत नसल्याचेही नमूद करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य: AP Photo/Mariam Zuhaib)
-
अफगाणिस्तानमधील कोळश्याच्या खाणीत काम करणाऱ्या मजुरीची मुलगी देशभरात घेण्यात येणाऱ्या प्रवेश परिक्षेत पहिली आली आहे. १८ वर्षीय शमसिया अलीजादाने एक लाख ७० हजार विद्यार्थ्यांसोबत परीक्षा दिली होती. यामध्ये तीने पहिला क्रमांक पटकावला आहे. (फोटो सौजन्य: फेसबुकवरुन)
-
युनिस्को सारख्या जागतिक स्तरावरील संस्थाही अफगाणिस्तानमधील शिक्षणासाठी अनेक पद्धतीने प्रयत्न करत आहे. (फोटो सौजन्य: Twitter/UNICEFAfg वरुन साभार)
-
देशातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या ३७ लाख विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के मुली असल्याचे येथील स्थानिक सरकारी अधिकारी सांगतात. युद्धजन्य परिस्थिती, गरिबी आणि पारंपारिक विचारसरणीमुळे अनेक पालक मुलांना शाळेत पाठवत नसल्याचे अधिकारी सांगतात. (फोटो सौजन्य: Twitter/Afghanistan_5 वरुन साभार)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य